167 सीसीटीव्ही, 97 सीमकार्ड आणि बहुरुपी तपास! अलिबाबा टोळी आणि पोलिसांचं सीक्रेट मिशन

कधी पोस्टमन बनले, तर कधी हातगाडीवाले! अलिबाबा टोळीला पकडण्यासाठी अनोखी स्ट्रॅटर्जी का वापरली? वाचा सविस्तर

167 सीसीटीव्ही, 97 सीमकार्ड आणि बहुरुपी तपास! अलिबाबा टोळी आणि पोलिसांचं सीक्रेट मिशन
मुंबई पोलिसांचा अफलातून तपासImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 9:31 AM

मुंबई : तब्बल 167 सीसीटीव्ही, 97 सीमकार्ड आणि 11 महिन्यांच्या बहुरुपी तपासानंतर अखेर अलिबाबा टोळीतील (Mumbai Theft Arrested) दोघा चोरट्यांना अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी (Dahisar Police Investigation) तपासात घेतलेल्या मेहनतीचं अखेर चीज झालंय. सोने चोरीप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून पोलीस अलिबाबा टोळीच्या (Mumbai Crime News) मागावर होते. अखेर टोळीतील दोघे चोर पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना कधी पोस्टमन तर कधी चक्क हातगाडीवाल्याचंही रुप धारण करावं लागलं होतं. आता चोरीचा माल, एक सोनार आणि दोघे चोर अशा एकून तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांची आता कसून चौकशी केली जातेय.

मुंबईच्य दहिसर पोलिसांनी 2021 मध्ये सोन्याच्या आरोपाखाली अलिबाबा टोळीतील चोरांना अटक केली. डिसेंबर 2021 साली चोरीची घटना घडली होती. यासाठी पोलिसांनी 167 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. 97 सीमकार्डचे लोकेशन तपासून अखेर दहिसर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

पकडलेल्या चोरांची विशेष बाब म्हणजे या लोकांनी वापरलेली सीमकार्ड्स ट्रकमध्ये अलिबाबाच्या नावावे येत होती, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. त्यामुळे या चोरांना पकडण्याच्या मोहिमेला दहसित पोलिसांच्या पतखाने अलिबाबा असं नाव दिलं होतं.

आता अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी 18.7 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा जप्त केलाय. या चोरीप्रकरणी मुंबई पोलीस झोन 12च्या डीसीपी स्मिता पाटील यांना सांगितलं की..

31 डिसेंबर 2021 रोजी दहिसर पूर्व चुनाभट्टी येथील सचिन नगर येथील एका फ्लॅटमधून 933 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 40 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी 167 सीसीटीव्ही आणि 97 सिमकार्डची मदत घेतली.

अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावं सलमान अन्सारी आणि हैदर अली सैफी अशी आहेत. तर चोरीचं सोनं खरेदी करणाऱ्याचं नाव खुशाल वर्मा असल्याचंही समोर आलंय. या आरोपींनी पकडण्यासाठी पोलीस कधी पोस्टमन तर कधी हातगाडीवाले म्हणून आरोपींच्या ठिकाणाभोवती फिरत असायचे, अशीही माहिती समोर आलीय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.