मुंबईतील धारावीत तणाव, धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, बीएससीच्या वाहनांची तोडफोड

Mumbai News: धारावीत संतप्त जमावाकडून गोंधळ सुरु आहे. एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक शनिवारी सकाळी धारावीत गेले होते. मनपाचे पथक जाताच एका समुदायाने हा अनिधिकृत भाग तोडण्यास विरोध केला.

मुंबईतील धारावीत तणाव, धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, बीएससीच्या वाहनांची तोडफोड
मुंबईतील धारावीत तणाव निर्माण झाला आहे.
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 12:27 PM

Mumbai dharavi tension: मुंबईतील धारावीत तणाव निर्माण झाला आहे. धारावीत असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला आहे. हा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध दर्शवत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे धारावीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. संतप्त नागरिकांनी मुंबई मनपाच्या वाहनांची तोडफोड केली आहे. वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत.

तणावाची परिस्थिती पाहून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, या प्रकरणी तोडगा निघाला आहे. कारवाई आठ दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून चर्चा, तणाव निवळण्यासाठी प्रयत्न

धारावीत संतप्त जमावाकडून गोंधळ सुरु आहे. एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक शनिवारी सकाळी धारावीत गेले होते. मनपाचे पथक जाताच एका समुदायाने हा अनिधिकृत भाग तोडण्यास विरोध केला. त्या समुदायाचे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पोलिसांकडून या समुदायाशी बोलणी सुरु केली आहे. बीएमसीच्या कारवाईला विरोध करत आहे.

रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला

लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वर्षांपासून या धार्मिक स्थळावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास विरोध केला जात आहे.

मुंबईतील धारावीत तणाव

धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.