मुंबई : मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी दुचाकी चोर टोळीतील 4 चोरट्यांना 7 चोरीच्या दुचाकींसह अटक केली आहे. ही टोळी मुंबई आणि परिसरातून महागड्या दुचाकी चोरायची. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांनी यूट्यूबवरुन दुचाकी कशी चोरी करायची याचं प्रक्षिण घेतलं होतं. दिंडोशी पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आलं आहे. चोरट्यांनी स्पेलंडर, युनिकॉर्न, अॅक्टिव्हा या गाड्या चोरल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिंडोशीचे एपीआय चंद्रकांत घार्गे यांनी सांगितले की, दिंडोशी पोलिसांच्या शोध पथकाला चोरट्यांची टोळी वाहने चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुरार पोलीस ठाण्यातून तीन दुचाकी चोरांना प्रथम अटक करण्यात आली, त्यानंतर चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहनं असल्याचे निष्पन्न झाले. नालासोपारा भागात चोरट्यांचा आणखी एक साथीदार राहत असल्याची माहिती मिळाली नंतर त्यालाही अटक करण्यात आली.
दिंडोशी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी पोलिसांना सांगितले की,गाड़ी कशी चोरायची, हे या लोकांना यूट्यूबवरून कळले होते. या टोळीतील चोरट्यांनी डीएन नगर पोलीस ठाणे, गोवंडी पोलीस ठाणे, सांताक्रूझ, जुई नगर आणि कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 वाहने चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी चार चोरट्यांना अटक करून 7 वाहने जप्त केली आहेत. ही टोळी लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी, स्वत:च्या वापरासाठी वाहने चोरायची. अनेकदा गाडी जायची तिथपर्यंत गाडी चालवायचे आणि जिथे गाडी थांबवायची तिथे सोडून जायचे, अशी माहिती दिंडोशी पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत घार्गे यांनी दिली आहे.
1.संदीप गायकवाड
2. गणेश चव्हाण उर्फ बूबा
3. योगेश सकरे
4.महेश स्वामी
सर्व आरोपी 20 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत, 10वी पर्यंत शिकलेले आहेत, कोणतेही काम करत नाहीत, सर्व आरोपी दारुच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याची माहिती देखील दिंडोशी पोलीस स्टेशनचे अधिकारी चंद्रकांत घार्गे यांनी दिली आहे.
इतर बातम्या:
Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला
Dombivali Crime : डोंबिवलीतील ‘त्या’ बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर
Mumbai Dindoshi Police arrested four two wheeler thefts with seven bikes