Mumbai-Goa Accident : लोअर परळहून गोव्यात जात होते, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! दोघे जागीच ठार

संतोष हरमलकर आणि त्यांची मुलगी आकांक्षा ही मुंबई-प्रभादेवी इथून गोव्याला जायला निघाले होते. आपल्या मूल गावी हरमल इथं जात असताना हा अपघात झाला.

Mumbai-Goa Accident : लोअर परळहून गोव्यात जात होते, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! दोघे जागीच ठार
भीषण अपघातImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 6:58 AM

सिंधुदुर्ग : मुंबई- गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway Accident) भीषण अपघात (Road Accident News) झाला. या अपघातात दोघांचा मृ्त्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कारचालकाचाही समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता हा अपघात झाला. लोअर परळमधील काही जण हे गोव्याला (Goa) जायला निघाले होते. या प्रवासादरम्यान, खासगी कारचा भीषण अपघात झाला. एका पुलाच्याक कठड्याला भरधाव कार आदळल्यानं ही अपघात झाला. या अपघातात दोघे ठार झाले असून चौघे जण जखमी झाले आहे. कारमधील काही प्रवासी हे मुंबईच्या प्रभादेवी तर काही प्रवासी हे अंधेरीतील असल्याचं कळतंय. आपल्या मूळ गावी देवदर्शनासाठी जाण्यासााठी कुटुंबीय निघाले होते. त्यादरम्यान, झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हा अपघात इतका भीषण होता की, कारचंही मोठं नुकसान झालंय.

नेमका अपघात कुठे झाला?

खासगी कारचा हा भीषण अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर झाला. सिंधुदुर्गातील साळीस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर असलेल्या डिव्हायडरमधील ओहोळावरील पुलावर कार धडकून हा अपघात झाला.

अपघातातील मृतांची नावं

  1. संतोष पांडुरंग हरमलकर, वय 48, प्रभादेवी
  2. सुधीर अर्जुन राणे, वय 56, अंधेरी

अपघातातील जखमींची नावं

  1. आकांक्षा संतोष हरमलकर, वय 23, प्रभादेवी
  2. दीप कासले, वय 21, मुंबई

कुठे निघाले होते?

संतोष हरमलकर आणि त्यांची मुलगी आकांक्षा ही मुंबई-प्रभादेवी इथून गोव्याला जायला निघाले होते. आपल्या मूल गावी हरमल इथं जात असताना हा अपघात झाला. सामोटे या पेडणे तालुक्यातील मूळ गावी ते जायला निघाले होते. हरमल इथं मंदिरात दर्शनाच्या उद्देशानं जायला निघाले असताना वाटेतच काळानं घाला घातला.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

जखमींवर उपचार सुरु

दरम्यान, जखमी झालेल्यांना तातडीनं स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातस्थळी बचावकार्य केलंय. कारमधील दीप आणि आकांक्षा यांना गंभीर दुखापत झाली आहे. आकांक्षाच्या डोक्याला तर दीप याच्या पायास जबर मार अपघातात बसलाय. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई गोवा महामार्ग हा आता चौपदरी होत असल्यानं या महामार्गावर वेगाची मर्यादा पाळणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय. अनेकदा या मार्गावर बेदरकारपणे वाहनं चालवून अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्याचं आव्हान सगळ्यांसमोर उभं ठाकलंय.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...