Gorai Car Accident | भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू

कारमधील युवक गोराई येथील क्लबमधून पूल खेळून परत येत होते. गोराई रोडवर त्यांची कार भरधाव वेगाने जात होती. यावेळी, वरेकर हे उपाहारगृहातील काम आटोपून घरी जात होते. कारने वरेकर यांना धडक दिल्याने ते हवेत सुमारे 20 फूट उडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या फूटपाथवर पडले.

Gorai Car Accident | भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू
गोराई कार अपघात
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 11:40 AM

मुंबई : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बसला जोरदार धडक दिल्यामुळे एका पादचाऱ्यासह दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला. 22 डिसेंबर रोजी मुंबईतील बोरीवली पश्चिमेकडील गोराई रोड परिसरात हा अपघात घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पाच जण क्लबमधून परत येत असताना हा अपघात झाला. दारुच्या नशेत कार चालवणाऱ्या रोहित मुखर्जी या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हॉटेलमध्ये नव्याने रुजू झालेल्या मामाला भाचीचं म्हणणं टाळत ड्युटीवर जाणं महागात पडलं.

कार अपघातात मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणीचाही मृत्यू झाला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. कार चालक नशेत असल्यामुळे रोहितचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी स्टारलाईन बसला आदळली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

प्रशांत बारेकर (45 वर्ष) असे मृत पादचाऱ्याचे नाव असून तो बोरिवली पश्चिम येथील एका खाजगी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. वरेकरांची भाची जान्हवी त्यांना भेटायला आली होती. मामा, आज जाऊ नकोस, अशी विनंतीही तिने केली. मात्र नवीन नोकरी असल्याने मामा गेला, तो कायमचाच

दुसरीकडे, डोक्याला मार लागल्याने कारमध्ये बसलेल्या अभिगेल जाधव (21) या तरुणीचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या तिघांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धडकेनंतर पादचारी हवेत 20 फूट उंच उडाला

ही घटना बुधवारी रात्री 11.30 वाजता गोराई रोडवर बस डेपोजवळ घडली. कारमधील युवक गोराई येथील क्लबमधून पूल खेळून परत येत होते. गोराई रोडवर त्यांची कार भरधाव वेगाने जात होती. यावेळी, बारेकर हे हॉटेलमधील काम आटोपून घरी जात होते. कारने बारेकर यांना धडक दिल्याने ते हवेत सुमारे 20 फूट उडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या फूटपाथवर पडले.

कारचे छत बसवर आदळून चिरडले

त्यानंतर कार रस्त्याच्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या बसवर आदळली. स्थानिकांनी जखमींना तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेले. कारचे छत बसवर आदळून पूर्णपणे चिरडले गेले होते. त्यामुळे अभिगेलचं डोकंही चिरडलं गेलं, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

संबंधित बातम्या :

चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या

VIDEO | भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या, जुन्या वादातून काटा काढला?

ड्रेनेजमध्ये सहकारी पडला, एकामागून एक सहा जण वाचवायला गेले, चौघांवर काळाचा घाला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.