मुंबई : मोफत जेवन दिले नाही म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. विक्रम पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. अखेर या प्रकरणात विक्रम पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. पाटील हे सांताक्रूझमधील वाकोला पोलीस स्टेशनमध्ये (Vakola Police) हाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होताच त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मध्यरात्री मोफत जेवण आणि दारू देण्यास हॉटेल कर्मचाऱ्यानं नकार दिला. मोफत जेवन देण्यास नकार दिल्याने विक्रम पाटील यांनी वाकोला परिसरातील एका हॉटेलमधील कॅशियरला मारहाण केली होती. हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे मरहाणीचे दृष्य कैद झाले, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओची गंभीर दखल घेऊन, अखेर विक्रम पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
दिवसभर रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर बंद होते. त्यामुळे हॉटेल कर्मचारी त्या पोलीस अधिकाऱ्याला मध्यरात्री साडे बारा वाजता मोफत जेवण देऊ शकला नाही. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याच्या अंगावर जात त्याला मारहाण केली. याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात विक्रम पाटील यांच्याविरोधात आयपीसी कलम 323 नुसार तक्रार करण्यात आली होती. असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटकडून देखील या घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर विक्रम पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
#WatchVideo: #Mumbai cop hits hotel cashier on refusing free food
The #CCTV footage of the incident, which took place around 12.30 am, went viral on social media @MumbaiPolice #News #India #ViralVideo pic.twitter.com/fpznGbERgD
— Free Press Journal (@fpjindia) December 23, 2021
NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!
नाशिक हादरले! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना मुंबईतून अटक