अशी ही बनवाबनवी!; जमिनीतून सोने सापडले म्हणून कमी किमतीत विकायचे…
या चौघांना शिवपार्क भाटपाडा विरार येथून अटक करण्यात आली आहे. हे चारही जण दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करत होते.
मुंबई : घर खोदत असताना जमिनीतून सोने सापडल्याचे सांगण्यात येत होते. यातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या टोळीतील (cheating gang) चार जणांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक ( Kasturba Marg police ) केली आहे. पोलिसांनी या गुंडांकडून 5 किलो बनावट सोन्याचे दागिने आणि 10 लाखांची रोकड जप्त केली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वृद्धाने काही दिवसांपूर्वी ही तक्रार दिली होती. आपल्याला काही जणांनी भेटून ५० लाखांची फसवणूक केल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी टीम तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा ही टोळी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असल्याचे निष्पन्न झाले.
या चार जणांना अटक
मुंबईतील विविध भागात जाऊन ते आधी लोकांना खरे सोने दाखवत होते. नंतर पैसे घेऊन बनावट सोन्याचे दागिने देऊन पळून जातात. विजयकुमार प्रेमप्रकाश राय (वय ३३), विनय मणिलाल परमार (वय २०), मणिलाल गोमासिंग परमार (वय ४३) आणि जीवदेवी मणिलाल परमार (वय ६३) अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत.
या चौघांना शिवपार्क भाटपाडा विरार येथून अटक करण्यात आली आहे. हे चारही जण दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करत होते.
वृद्धेने दिली होती तक्रार
तक्रारदार वृद्धेला या लोकांनी सांगितले की, घरात खोदकाम करताना गुप्तधन सापडले आहे. परंतु तो उघड करेल म्हणून तो कोणत्याही सोनाराला विकू शकत नाही.
या गुंडांविरुद्ध मुंबईसह देशातील इतर राज्यांतही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अशी माहिती परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली.