Khar Accident : खार दांडा रोडवर भीषण अपघात! इनोव्हाच्या धडकेत अर्टिगा उलटली, पाहा Video

Mumbai Khar Accident Video : यात अर्टिगा कार फरफटत तर गेलीच शिवाय रस्त्यावरच पलटीही झाली.

Khar Accident : खार दांडा रोडवर भीषण अपघात! इनोव्हाच्या धडकेत अर्टिगा उलटली, पाहा Video
खारमध्ये अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 9:49 AM

मुंबई : मुंबई (Mumbai Accident News) रात्रीच्या वेळी सिग्नल बंद असतात आणि सुरु असले तरी रात्रीच्या वेळी सिग्नल पाळणारे वाहन चालक मुंबईत क्वचितच आढळतील. अशावेळी चौकात वाहनं जर वेगानं हाकली, तर काय भयंकर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. मुंबईत खारमध्ये भीषण अपघात (Khar Accident Video) झाला. भरधाव इनोव्हा कारचे दुसऱ्या एका अर्टिगा कारला जबर धडक दिली. या धडकेत इनोव्हा कारचा (Toyota Innova Car hits Maruti Suzuki Ertiga) वेग इतका प्रचंड होता की यामध्ये अर्टीगा कारला इनोव्हो थेट फरफटतच घेऊन गेली. 23 जुलै रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. सुदैवानं यावेळी रस्त्यावर इतर कुणीही नव्हतं. नाहीतर मोठा अनर्थ घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होता. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहून इनोव्हा आणि अर्टीगामध्ये झालेली धडक किती भीषण होती, याची कल्पना करता येऊ शकेल.

इनोव्हा कारने दिलेली धडक इतकी भीषण होती, की यात अर्टिगा कार फरफटत तर गेलीच शिवाय रस्त्यावरच पलटीही झाली. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना पाहून प्रत्यक्षदर्शीही घाबरुन गेले होते.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

मध्यरात्री खार दांडा रोडवर वाहनांची फारशी वर्दळ नसते. क्वचितच एखाद दुसरी गाडी जाताना दिसते. पण नवखा कुणी चालक असेल, तर त्याला मोकळे रस्ते आकर्षित करु शकतात. यामुळे वेग वाढणं हेही स्वाभाविकच आहे. पण चौकातून जाताना आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज घेत गाडी नेली नाही, तर काय होतं, हे खार दांडा इथं पाहायला मिळालंय.

इनोव्हा कार भरधाव वेगात होती. खार दांडा इथून वेगानं ही कार चौक पास करुन सरळ निघणार होती. पण चौकातील समांतर रस्त्यावरुन एक अर्टिगा कारही येत होती. इनोव्हा कार आणि अर्टिगा कार या दोन्ही गाड्यांच्या चालकांनी एकच चूक केली. ही चूक होती, चौकातून जाताना आजूबाजूला न बघण्याची. तसं केल्यानं या दोन्ही वाहनांना आपल्या आजूबाजूने गाडी येतेय की नाही, याची पुसटशीही कल्पना नव्हती. अखेर दोन्ही गाड्या एकाच वेळी चौकात आल्या आणि एकमेकांना भिडल्या.

त्यातही इनोव्हाचा वेग हा इतका जास्त होता, की इनोव्हाने थेट अर्टिगा कारला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फरफटत नेलं आणि फुटपाथवर गाडी चढवली. यात अर्टिगा कारच्या क्लिनर साईड दरवाजाला जबरदस्त मार बसला. तर इनोव्हा कारच्या समोरच्या बाजूचा बंपर आणि बोनेटलाही जोरदार फटका बसला. यात दोन्ही गाड्यांच्या बॉडीचं प्रचंड नुकसान झालंय.

पाहा व्हिडीओ :

इनोव्हा आणि अर्टिगाची जोरदार धडक झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनी गर्दी केली. या अपघातात भयंकर आवाज झाल्यानंतर आजूबाजूचे लोकही हादरुन गेले होते. त्यानंतर गाडीच्या ठिकाणी येऊन त्यांनी अपघातग्रस्त गाडीतील चालक आणि प्रवाशांची चौकशी केली. या अपघातात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. तर दोन्ही कारच्या चालकांना किरकोळ मार बसल्याचं सांगितलं जातंय. या अपघातामुळे रात्रीच्या वेळी बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यांवर आता काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.