Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kandivali CCTV Video : …आणि मस्करीची कुस्करी! प्लॅटफॉर्मवरुन उडी टाकली, थेट लोकलला धडकला, कांदिवली स्थानकात तरुणाच्या चिंधड्या उडाल्या

तरुणाला जबर मार बसला आणि तरुण लोकलखाली येऊन त्यांच्या चिंधड्या उडाल्या.

Kandivali CCTV Video : ...आणि मस्करीची कुस्करी! प्लॅटफॉर्मवरुन उडी टाकली, थेट लोकलला धडकला, कांदिवली स्थानकात तरुणाच्या चिंधड्या उडाल्या
थरारक घटना..Image Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 7:28 AM

मुंबई : रेल्वे रुळ जीवावर बेतू शकतं, हे माहीत असूनही मुंबईत (Mumbai Local Train News) रेल्वे रुळ ओलांडून जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत घट होत नाहीय. असं नेमकं का होतंय? हे अधोरेखित करणारी घटना कांदिवली स्थानकातून (Kandivali Station) समोर आलीय. कांदिवलीत एका तरुणाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. थट्टा मस्करीत मित्रांसोबत कांदिवली स्थानकात असताना या तरुणानं जीव गमावलाय. या धक्कादायक घटनेनं अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेजही (Mumbai Local Accident CCTV Video) समोर आलं आहे. कांदिवलीच्या प्लॅटफॉर्म नंबरवर एकवर ही घटना घडली. रुळ ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी असलेली लोकल पकडण्याच्या इराद्याने हा तरुणा जात होता की काय, अशी शंका घेतली जातेय. मात्र त्या दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अगदी कडेला जाऊन उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने धडक दिली. यानंतर तरुणाला जबर मार बसला आणि तरुण लोकलखाली येऊन त्यांच्या चिंधड्या उडाल्या. या थरारक घटनेनंतर या तरुणाच्या दोन्ही मित्रांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. प्रचंड घाबरलेल्या तरुणांनी आपला मित्र रेल्वे रुळांखाली आल्यानं पाहून लगेचच मागच्या मागे पळ काढल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे.

तरुण नशेत होता?

रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेला हा तरुण नशेमध्ये होता, असंही सांगितलं जातंय. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शताब्दी रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं. पण तिथं डॉक्टरांनी या तरुणाला मृत घोषित केलं. मृत तरुणाची अद्याप ओळख पडलेली नाही. मात्र या घटनेनंतर मृत तरुणावर रुळ ओलांडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे. लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या फरार मित्रांचाही शोध घेतला जातोय. लोकलच्या धडकेत तरुण ठार झाल्यानंतर रेल्वे स्थानकात एकच घबराट पसरली होती.

मुंबई लोकल स्थानकांमध्ये आणि लोकलच्या आतमध्येही प्रवाशांना रेल्वे रुळ न ओलांडण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात असतं. मात्र प्रवाशांकडून अनेकदा रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न होतो. आणि त्यातून अशा दुर्दैवी घटना घडून काहींना प्राण गमवावा लागल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. अशातच आता मित्रांसोबत थट्टा मस्करी करताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेल्या तरुणाचा हा थरारक व्हिडीओ काळीज हेलावून टाकणारा आहे.

या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.