Mumbai Accident : डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडलं! मालाड लिंक रोडवरील अपघातात 25 वर्षीय तरुण ठार

सुधीर कुमार चौधरी असं अपघातातील मृत तरुणाचं नाव आहे.

Mumbai Accident : डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडलं! मालाड लिंक रोडवरील अपघातात 25 वर्षीय तरुण ठार
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:15 AM

मुंबई : ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडलं. मालाड लिंक रोडवर झालेल्या या अपघातामध्ये (Mumbai accident News) तरुणाचा जागीच जीव गेला आहे. तरुणाला चिरडल्यानंतर भरधाव डंपरचा चालक फरार झाला होता. त्यालाही अखेर अटक करण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 7.20ला अपघात घडला होता. सुधीर कुमार चौधरी असं अपघातातील मृत तरुणाचं नाव आहे. सुधीर कुमार हा एक किराणा माल विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स (e-Commerce) कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. तो सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी जात असतेवेळी त्याला डंपरने धडक दिली. अपघात घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) नसल्यामुळे ही धडक नेमकी कशा झाली, हे कळू शकलेलं नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अखेर फरार डंपर चालकाला शोधून काढत त्याच्यावर अटकेची कारवाई केलीय.

कसा घडला अपघात?

एका बांधकाम कंपनीच्या सुरक्षारक्षकाच्या देखतच हा अपघात घडला. इनफिनीटी मॉल जवळ सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी महेश पाटील सुरक्षा रक्षकाचं काम करतो. त्याने हा अपघात पाहिला होता. या अपघाताबद्दल पोलिसांना महेश पाटील याने माहिती दिली. त्यात महेशने हा अपघात कसा झाला आणि डंपरचालक जखमी सुधीर कुमार याला मदत न करतात कसा फरार झाला, याबाबत सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जागीच ठार

महेशने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठलं आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या 25 वर्षीय तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात तरुणाचा उपचारासाठी नेलं असता तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुधीर कुमार चौधरी हा मालाडमधील मालवणी परिसरातील अंबुजवाडी इथं राहायला होता, अशीही माहिती तपासातून पुढे आलीय.

बेजबाबदारपणे वाहन चालवून तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर पोलिसांनी कलम 304-अ अन्वये गुन्हा दाखल घेतला आहे. तसंच डंपर चालकालाही अटक केली आहे. तर तरुणाच्या अपघाती मृत्यूने चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.