मुंबई : अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने एका नायजेरियन ड्रग्स तस्कराला तब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल 3 कोटी 90 लाख रुपयांचे कोकेन ड्रग्स जप्त केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत अमली पदार्थविरोधी पथकाचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी अधिक माहिती दिली आहे. (Mumbai NCB arrests nigerian drug smuggler seized 3 crore of Cocaine)
मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्स तस्करीसाठी मुंबईत एक नायजेरियन नागरिक येणार असल्याची माहिती एनसीबी विभागाला मिळाली. ही गुप्त माहिती मिळताच एनसीबी विभागाने सापळा रचून या अधिकाऱ्याला पकडण्याचे ठरवले. त्यानुसार एनसीबीने कारवाई करुन या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 1 किलो 300 ग्रॅन कोकेन ड्रग्स जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचे मूल्य तब्बल 3 कोटी 90 लाख रुपये आहे.
अटक करण्यात आलेली आरोपी हा मागील पाच वर्षांपासून ड्रग्स तस्करीच्या व्यवसायात सक्रिय आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून या आरोपीने त्याच्या एका मित्राला हाताशी धरुन कपड्याचा व्यवसाय सुरु केला. नंतर याच मित्राला ड्रग्स तस्करीमध्ये सोबत घेतले. 2016 पासून हा नायजेरियन नागरिक भारतात आला. तेव्हापासून हा मुंबईमध्ये सक्रिय असून तो ड्रग्स तस्करी करत आहे. मोहम्मद अली रोडवर त्याने कपड्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्याचा मुख्य व्यवसाय ड्रग्स तस्करी हाच होता.
सध्या अटक करण्यात आलेला नायजेरियन नागरिक अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्याच्या अटकेनंतर मुंबईमधील ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या :
Hemangi Kavi : ‘पंचविशीत ऐकलेली खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव!’, हेमांगी कवीची थँक यू पोस्टhttps://t.co/65DNaIXj9g#hemangikavi | #marathifilms | #marathiactress
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
(Mumbai NCB arrests nigerian drug smuggler seized 3 crore of Cocaine)