Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंगच्या अडचणीत वाढ, आता आरपीएफही करणार चौकशी

जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंगच्या अडचणीत वाढ, आता आरपीएफही करणार चौकशी
आरोपी चेतन सिंगची आरपीएफकडून होणार चौकशीImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 8:33 AM

मुंबई / 9 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार करत चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी चेतन सिंगची आता आरपीएफही चौकशी करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सिंगची चौकशी करण्यासाठी आरपीएफची टीम जीआरपीकडे चेतन सिंगला ताब्यात घेण्याची मागणी करणार आहे. वरिष्ठ एएसआय टिकाराम मीणा यांना का मारले? हत्याचे कारण काय होते? ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशाला का मारलं? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आरपीएफला जाणून घ्यायची आहेत. आता आरपीएफच्या चौकशीत काय नवीन माहिती समोर येतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या जीआरपी आणि स्पेशल एसआयटीकडून चौकशी सुरुंय

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये 31 जुलै रोजी पहाटे गोळीबाराची घडली. या घटनेत आरपीएफचे एएसआय टीकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन सिंग याला अटक करण्यात आली. चेतन सिंगची जीआरपी आणि स्पेशल एसआयटी पथकाकडून घटनेचा तपास सुरु आहे. मात्र आता आरपीएफ अंतर्गत चौकशीसाठी चेतनला ताब्यात घेण्यात आहे.

चेतन चौकशीला सहकार्य करत नाही

चेतन सिंगची लगातार चौकशी सुरु आहे. मात्र चेतन चौकशीला सहकार्य करत नाही. कोणत्याही प्रश्नांची चेतन उत्तरं देत नाही. तीन प्रवाशांना त्याने का मारले याचे कोणतेही ठोस उत्तर चेतन सिंगने अद्याप दिलेले नाही. तो सतत आपले वक्तव्य बदलत असतो, स्वत:ला मानसिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. चेतन सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, संपूर्ण घटनेचे क्राइम सीन रीक्रिएट दोन ते तीन वेळा केले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

996047

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.