Mumbai Crime : पश्चिम रेल्वेच्या टीटीई लॉबीमध्ये रंगली दारु पार्टी, तीन टीसींना रंगेहाथ पकडले !

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम टर्मिनसमध्ये पाहणी करत होते. पाहणी करत असतानाच डीसीएम यांच्यासमोर जे दृश्य आले त्यानंतर सर्वच हैराण झाले.

Mumbai Crime : पश्चिम रेल्वेच्या टीटीई लॉबीमध्ये रंगली दारु पार्टी, तीन टीसींना रंगेहाथ पकडले !
वांद्रे टर्मिनसमध्ये दारु पिताना टीसींना रंगेहाथ पकडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 4:07 PM

मुंबई / 24 ऑगस्ट 2023 : पश्चिम रेल्वेवरवरील वांद्रे टर्मिनसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क टीटीई लॉबीमध्ये दारु पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. तीन टीसींना टीटीई लॉबीमध्ये दारु पिताना रंगेहाथ पकडण्यात आले. समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) अशी तिघांची नावे आहेत. तिघेही बडोदा विभागातील टीटीई आहेत. तिघांनाही निलंबित करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या टर्मिनसमध्ये ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा प्रकार उघड

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम विनीत अभिषेक यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अभिषेक हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना अभिषेक हे टीटीई लॉबीमध्ये गेले. टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारु पित असल्याचे उघडकीस आले. तीन टीसी रेल्वेच्या आवारातच मद्यप्राशन करताना रंगेहाथ पकडले.

तिन्ही टीसींवर निलंबनाची कारवाई

बुधवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे टर्मिनसच्या TTE लॉबीची पाहणी केली. यावेळी समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) यांना रंगेहाथ पकडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तिन्ही टीसींवर निलंबनाची कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.