Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई पॅसेंजरमधील गोळीबार प्रकरण, गोळीबारानंतरचा आरोपीचा व्हिडिओ समोर

जयपूर-मुंबई पॅसेंजरमधील गोळीबाराच्या घटनेनंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई पॅसेंजरमधील गोळीबार प्रकरण, गोळीबारानंतरचा आरोपीचा व्हिडिओ समोर
जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारानंतर व्हिडिओ समोरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 1:07 PM

मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या गोळीबारात एका एएसआयसह तीन निष्पाप प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने हा गोळीबार केला. जयपूर-मुंबई पॅसेंजमधील बी-5 ही घटना घडली. गोळीबारानंतर आरोपीचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी प्रवाशांना दम देण्याचा प्रयत्न करत आहे. चेतनने हत्या केलेल्यांपैकी एएसआय टीकाराम सोडले बाकी तीन प्रवासी मुस्लिम आहेत. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या गोळीबाराच्या चौकशीसाठी रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

चेतन सिंहचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की, या लोकांना पाकिस्तानमधून ऑपरेट केलं जातंय. तसेच मीडियाचंही नाव घेताना दिसत आहे. शिवाय भारतात रहायचं असेल तर मोदी आणि योगी शिवाय पर्याय नसल्याचेही सांगताना दिसत आहे. या व्हिडिओतून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेला वेगळंच वळण मिळत आहे.

सकाळपासून कॉन्स्टेबल आणि एएसआयमध्ये वाद झाला. यातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत होती. मात्र नंतर आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याने यातून त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं. यानंतर आता आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे स्वरुप प्राप्त होत आहे. ज्या लोकांवर त्याने गोळीबार केला ते तिघेही मुस्लिम आहेत, त्यामुळे द्वेषातून किंवा गैरसमजातून त्याने हा गोळीबार केला का याबाबतही चौकशी सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.