मास्क न लावण्यावरुन वाद विकोपाला, अंधेरीत महिलेनं दोन क्लीन-अप मार्शलला धुतलं

मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पश्चिमेत (Andheri West) क्लीन अप मार्शला (Clean Up Marshal) मारहाण करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. क्लीन-अप मार्शलच्या दादागिरीमुळे एका महिलेकडून दोन क्लीन-अप मार्शलला मारहाण करण्यात आली आहे.

मास्क न लावण्यावरुन वाद विकोपाला, अंधेरीत महिलेनं दोन क्लीन-अप मार्शलला धुतलं
clean up marshal fight
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 7:45 AM

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पश्चिमेत (Andheri West) क्लीन अप मार्शला (Clean Up Marshal) मारहाण करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. क्लीन-अप मार्शलच्या दादागिरीमुळे एका महिलेकडून दोन क्लीन-अप मार्शलला मारहाण करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

अंधेरी पश्चिम येथील एस.वी रोडवर गुरुवारी (18 नोव्हेंबर) संध्याकाळी एक महिला रिक्षामध्ये मास्क तोंडाच्या थोडं खाली घालून जात होती. अशातच बीएमसीच्या दोन क्लीन-अप मार्शल्सनी त्या महिलेचे फोटो काढून 200 रुपयाच्या दंडाची पावती फाडली.

मात्र, यावरुन महिला आणि क्लीन-अप मार्शलमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यात क्लीनअप मार्शल गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुपक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.

जुहूमध्येही क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी

गेल्या काही दिवसांपूर्वी जुहू परिसरात क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करताना ही मारामारी झाली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. यावेळी मास्क न लावता नागरिक फिरत असल्यामुळे क्लीन अप मार्शलने त्यांना अवडले. तसेच, कारवाई म्हणून त्यांना दंड देण्यास सांगितले. यावेळी नागरिक तसेच मार्शल यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. नागरिक आणि मार्शल यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

संबंधित बातम्या :

मुंबईतील क्लीन अप मार्शलच्या कोटवर त्याची ओळख असणार; गैरवर्तणुकीची महापौरांकडून गंभीर दखल

कोरोना नियम मोडल्याने दीड लाखांच्या खंडणीची मागणी, BMC च्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.