Mumbai Crime | मृत्यू झाला समजून खटला बंद केला, मोस्ट वॉन्टेड आरोपी 20 वर्षांना पोलिसांना गवसला

मुंबई पोलिसांनी एका कुख्यात आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचा मृत्यू झाला असं समजून खटला बंद करण्यात आला होता. पण मुंबई पोलिसांनी कागदोपत्री मेलेल्या या आरोपीला नालासोपाऱ्यातून शोधून काढलं आहे. पोलिसांनी आरोपीला तब्बल 20 वर्षांनी शोधून काढलं आहे.

Mumbai Crime | मृत्यू झाला समजून खटला बंद केला, मोस्ट वॉन्टेड आरोपी 20 वर्षांना पोलिसांना गवसला
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 9:44 PM

गोविंद ठाकूर, Tv9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : मुंबई पोलिसांच्या हातून गुन्हेगारांनी पळून जाणं हे शक्य होणार नाही. पोलीस सातत्याने गुन्हेगारांच्या मागावार असतात. गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी मुंबई पोलीस सतर्क असतात. येत्या 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी हजारो पोलीस कर्मचारी मुंबईच्या कानाकोपऱ्यात तैनात असणार आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या धडाकेबाज मुंबई पोलिसांच्या आणखी एका कामगिरीची सध्या कांदिवलीत जोरदार चर्चा होत आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या 20 वर्षांपासून फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला शोधून काढलं आहे. त्याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलिसांनी एका कुख्यात आणि फरार आरोपीला तब्बल 20 वर्षांनंतर अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या आरोपीचा मृत्यू झाला असं मानत खटला देखील बंद केला होता. पण अचानक 20 वर्षांनी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आणि त्यांनी वॉन्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीचं नाव दीपक नारायण भिसे असं आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांना वाटलं की त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे दीप भिसे याची फाईल बंद करण्यात आली होती. या दीपक भिसेवर खून, अर्ध खून, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या भिसेला आता अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या दीपक भिसे याचं वय 62 वर्षे इतकं आहे.

आरोपी पत्नीलाही भेटायला येत नव्हता

कांदिवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक नारायण भिसे याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. तसेच न्यायालयात खटला सुरू होता. पण 2003 मध्ये आरोपीने कोर्टात येणं बंद केले होते. त्याचा कोणाशीही संपर्क नव्हता. तो पत्नीला भेटायलाही येत नव्हता. तो नालासोपारा नाव, गाव बदलून, ओळख बदलून राहत होता. न्यायालयाने आरोपीला वॉन्टेड घोषित करून खटला बंद केला होता. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर कांदिवली पोलिसांना दीपक भिसे याचा थांगपत्ता लागला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.