लहान-मोठ्या जाऊबाई, मुंबईत महिलांना हेरायच्या, संधी मिळताच पर्स, दागिने चोरी करायच्या, अखेर सोन्याच्या काठीसह बेड्या

कांदिवली पूर्वेच्या समतानगर पोलिसांनी तीन महिला चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे तीनही महिला एकमेकांच्या लहान-मोठ्या जाऊबाईल आहेत. या तीनही जाऊ मुंबईच्या बोरिवली, कांदिवली आणि भांडूपमध्ये चोरी करायच्या.

लहान-मोठ्या जाऊबाई, मुंबईत महिलांना हेरायच्या, संधी मिळताच पर्स, दागिने चोरी करायच्या, अखेर सोन्याच्या काठीसह बेड्या
लहान-मोठ्या जाऊबाई, मुंबईत महिलांना हेरायच्या, संधी मिळताच पर्स, दागिने चोरी करायच्या, अखेर सोन्याच्या काठीसह बेड्या
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 3:30 PM

मुंबई : कांदिवली पूर्वेच्या समतानगर पोलिसांनी तीन महिला चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे तीनही महिला एकमेकांच्या लहान-मोठ्या जाऊबाई आहेत. या तीनही जाऊ मुंबईच्या बोरिवली, कांदिवली आणि भांडूपमध्ये चोरी करायच्या. त्या बस, ट्रेन आणि अगदी रिक्षातही चोरी करायच्या. त्या गर्दीत जायच्या. तिथे संधी मिळताच महिलांच्या पर्स, सोने, दागिने आणि पैसे चोरुन पळून जायचे. अखेर या तीनही महिला चोरांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नेमकं काय घडलं?

कांदिवलीच्या समतानगर पोलिसांनी तीनही महिलांना भांडूपमधून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाख किंमतीचे दागिन्यांसह एक सोन्याची काठीही जप्त केली. काही दिवसांपूर्वी 38 वर्षीय रोहिणी आखाडे यांनी समतानगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. आरोपी महिलांनी त्यांच्या पर्समधून 55 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरुन तिला बसमधून ढकलून दिले, अशी तक्रार महिलेने पोलिसात केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरु केला होता. अखेर पोलिसांना या तपासात यश आलं आहे.

पोलिसांनी महिला चोरांना कसं पकडलं?

फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासादरम्यान समता नगर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफ एरियाचे फुटेज तपासताना या टोळीचा एक सदस्य भांडूपला जाताना दिसला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी भांडूप परिसरात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला चोरांची गँग दिसली.

तीनही महिलांना अखेर बेड्या

पोलिसांनी सीसटीव्हीच्या आधारावरच तीन महिलांना भांडूपमधून अटक केली. अनुसया चंद्रकांत गायकवाड (55), मारक्का उर्फ मारुबाई लक्ष्मण गायकवाड (50), बेबी रामू गायकवाड (52) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या तीनही महिलांवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सर्व स्त्रिया आपापसात नातेवाईक आहेत.

बोलण्यात गुंतवायचे, संधी मिळताच चोरी

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अशाच एका टोळीला जेरबंद केले होते. या टोळीतील चोरटे हे बस, ट्रेन किंवा गर्दिच्या ठिकाणी लोकांना बोलण्यात गुंतवायचे. त्यांचा विश्वास संपादित करायचे. नंतर योग्य संधी मिळताच नागरिकांच्या बॅगा, मोबाईल, दागिने, महागड्या घड्याळ चोरायचे. आरोपी चोरट्यांनी या युक्तीचा वापर करुन अनेकांना लुबाडलं होतं. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, मुंबई पोलिसात याबाबतची तक्रार आली तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या गँगचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.

हेही वाचा : 

औरंगाबादमध्ये महामार्गावर बस उलटली, जखमी प्रवाशांना सोडून ड्रायव्हरचा पळ

दुभाजक तोडून ट्रकची कारला धडक, एकाचा मृत्यू, महिला पोलिसाच्या पतीसह दोघे जखमी

दरोड्याचा तयारीतील तिघांना बेड्या, पुणे-कोकणातील नऊ घरफोड्या उघड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.