आरोपीच्या शोधात झारखंडला गेले, गावकऱ्यांनी घेरले; मात्र मुंबई पोलीस जिद्द हरले नाहीत !
अत्यंत दुर्गम भागात असलेला गावात पोलिसांनी अथक परिश्रमातून प्रवेश मिळवला. गावात लपून बसलेल्या आरोपीला पकडून तेथून पुन्हा मुंबई गाठली.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे वेळोवेळी कौतुक झाले आहे. विविध धाडसी कारवायांमध्ये मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपला पराक्रम सिद्ध केला आहे. पोलिसांच्या अशाच धडाकेबाज कामगिरीचा नुकताच एका कारवाई येथून प्रत्यय आला आहे. सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी झारखंड (Mumbai Police reached Jharkhand) गाठले. तेथील अत्यंत दुर्गम भागात असलेला गावात पोलिसांनी अथक परिश्रमातून प्रवेश मिळवला. गावात लपून बसलेल्या आरोपीला पकडून (Accused Arrested) तेथून पुन्हा मुंबई गाठली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईला सर्व स्तरांतून सलाम ठोकला जात आहे.
मात्र या कारवाईत गावकऱ्यांकडून सहकार्य मिळण्याऐवजी पोलीस पथकाला स्थानिक गावकऱ्यांनी घेरले. गावकऱ्यांच्या या विरोधी भूमिकेनंतरही मुंबई पोलीस जिद्द हरले नाहीत. गावकऱ्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. त्यानंतरही पोलिसांनी माघार न घेता आरोपीला पकडलेच.
ज्वेलरी दुकानातून लाखोंचे दागिने चोरून चोरटा झाला होता फरार
मुंबई पोलिसांनी ज्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले, त्या गुन्हेगारान शहरातील एका ज्वेलरी दुकानातून लाखो रुपयांचे दागिने चोरले होते. हे चोरीचे दागिने लंपास करत त्याने थेट झारखंड येथील आपले मूळगाव म्हटले होते.
अखेर मुंबईतील एमएचबी पोलिसांच्या पथकाने कारवाईमध्ये हिम्मत दाखवत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. रबीउल शेख असे 40 वर्षीय अटक आरोपीचे नाव आहे.
150 लोकांनी पोलिसांना चहुबाजूंनी घेरले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, MHB पोलिसांचे पथक झारखंडमधील आरोपीच्या गावी त्याला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी गावातील सुमारे 150 लोकांनी पोलिसांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला.
गावकऱ्यांच्या हल्ल्यात सूर्यकांत पवार नावाचा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीला झारखंडमधील सायबगंज जिल्ह्यातील उधवा गावातून अटक करून मुंबईत आणले.
12 सप्टेंबर रोजी दहिसर पश्चिम सबवेजवळ असलेल्या दीपमाला ज्वेलर्सच्या दुकानात लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. चोरी केल्यानंतर आरोपी गावी पळून गेला होता. आरोपीचे गाव चारही बाजूंनी नदीने वेढलेले आहे.
गावात जाण्यासाठी एकच रस्ता आहे. लाकडी पूल पार करून गावात जावे लागते. अशा परिस्थितीत आरोपीला पकडणे पोलिसांसाठी जोखमीचे काम होते. मुंबई पोलिसांनी ते आव्हान स्वीकारून मध्यरात्री आरोपीला अटक करून लाकडी पूल ओलांडून मुंबईत आणले.
आरोपीविरोधात मुंबईसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
अटक आरोपीविरुद्ध मुंबई, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी चोरी, घरफोडी, बनावट नोटांचा व्यवहार असे गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, झारखंड पोलिसांनी मुंबई पोलिसांवर हल्ला करणार्या 12 गावकऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये आरोपीच्या भावाचाही समावेश आहे. MHB पोलिसांचे कौतुकास्पद काम पाहून भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी सर्व पोलिसांचा सत्कार केला.