हरियाणातून विमानाने मुंबईत यायचे आणि पैसे घेऊन जायचे; हायटेक चोरांचा कारनामा ऐकून तुम्हीही शॉक व्हॉल !

हे दोघेही हरियाणाचे रहिवासी आहेत. हे दोन्ही आरोपी हरियाणातून मुंबईत विमानाने यायचे आणि एटीएममध्ये फसवणूक करून विमानाने हरियाणात परत जायचे.

हरियाणातून विमानाने मुंबईत यायचे आणि पैसे घेऊन जायचे; हायटेक चोरांचा कारनामा ऐकून तुम्हीही शॉक व्हॉल !
हरियाणातून विमानाने मुंबईत यायचे आणि पैसे घेऊन जायचेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 5:02 PM

मुंबई : पैशासाठी गुन्हेगार कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. मालाडमध्ये अशीच एक फसवणुकीची (Fraud) घटना उघडकीस आली आहे. पैसे लाटण्यासाठी चोरांनी जी शक्कल लढवली (Modus Operandi) ते ऐकून बँक अधिकाऱ्यांसह पोलिसही चक्रावून गेले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Two Accused Arrested) केली आहे. विशेष म्हणजे दोघेही आरोपी हरियाणातील असून, विमानाने मुंबईत यायचे आणि एटीएममधून पैसे घेऊन रफूचक्कर व्हायचे.

आरिफ खान आणि रशीद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. हे दोघेही हरियाणाचे रहिवासी आहेत. हे दोन्ही आरोपी हरियाणातून मुंबईत विमानाने यायचे आणि एटीएममध्ये फसवणूक करून विमानाने हरियाणात परत जायचे.

अशी करायचे फसवणूक?

दोन आरोपींपैकी एकाने पैसे काढले असता, दुसरा आरोपी पैसे निघताच एटीएम मशीनच्या मागील बाजूस असलेली विद्युत तार काढून टाकत असे. त्यामुळे तांत्रिक त्रुटी निर्माण व्हाययी आणि आरोपी संबंधित बँकेकडे तक्रार करायचे. यानंतर बँक त्यांना तेवढे पैसे रिफंड देत असे.

हे सुद्धा वाचा

तर काही वेळा एटीएममधून पैसे निघत असतानाच जेथून पैसे बाहेर येतात तेथे मशीनचा भाग दाबून ठेवायचे. यामुळे एटीएममध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण व्हायची. त्यानंतर संबंधित बँकेला फोन करून पैसे रिफंड घ्यायचे.

अशी उघडकीस आली घटना?

18 ऑक्टोबर रोजी सकाळी एका एटीएम सेंटरमध्ये दोन लोक छेडछाड करत असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर एटीएमकडे धाव घेत दोघा आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली.

चौकशीत आरोपींनी सर्व गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी सांगितल्यानंतर पोलिसांचेही डोळे विस्फारले. दोघेही हरियाणाचे रहिवासी असल्याचे समोर आले. ज्या एटीएममध्ये सीसीटीव्ही आणि वॉचमन नसायचा अशा एटीएम सेंटरला आरोपी आपले टार्गेट करायचे.

आरोपींकडून रोकड आणि एटीएम कार्ड जप्त

आरोपींकडून पोलिसांनी 30 हजारांची रोकड आणि 68 एटीएम कार्ड जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेली सर्व एटीएम कार्ड आरोपींच्या ओळखीच्या व्यक्तींची आहेत. फसवणुकीतून मिळालेल्या पैशातील काही भाग आरोपी कार्डधारकाला देत असत.

या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे अद्याप कोणीही तक्रारदार नसून अशा प्रकारे बँकेची फसवणूक झाल्याचे पहिलेच प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपींनी अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारची फसवणूक केली आहे. आरोपींची सखोल चौकशी सुरु आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.