Parambir Singh | पुन्हा कसाब का होतोय ट्रेंड? काय आहे परमबीर सिंगावर गंभीर आरोप, तोही माजी एसीपीचा!

आज 13 वर्षांनंतर कसाब पुन्हा एकदा ट्रेंड होतोय. मुंबई पोलीसचे सेवानिवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी मुंबई पोलीसचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 2008 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दहशतवादविरोधी पथकात तैनात असलेल्या परमबीर सिंग यांनी एका हवालदाराच्या ताब्यातून अजमल कसाबचा मोबाईल फोन घेतला होता आणि तो त्यांनी कधीही परत केला नाही.

Parambir Singh | पुन्हा कसाब का होतोय ट्रेंड? काय आहे परमबीर सिंगावर गंभीर आरोप, तोही माजी एसीपीचा!
Ajmal Kasab - Parambir Singh
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 9:27 AM

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 (26/11 Terror Attack) मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झालीत. मुंबईच्या (Mumbai) इतिहासातील सर्वात महाभयंकर हल्ल्यांपैकी हा होता. या हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. आज 13 वर्षांनंतर कसाब पुन्हा एकदा ट्रेंड होतोय. मुंबई पोलीसचे सेवानिवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी मुंबई पोलीसचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 2008 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दहशतवादविरोधी पथकात तैनात असलेल्या परमबीर सिंग यांनी एका हवालदाराच्या ताब्यातून अजमल कसाबचा मोबाईल फोन घेतला होता आणि तो त्यांनी कधीही परत केला नाही. तसेच, त्यांनी याबाबत वरिष्ठांनाही कळवले नाही, असा गंभीर आरोप शमशेर पठाण यांनी या पत्रातून केला आहे. शमशेर पठाण हे पायधुनी पोलीस ठाण्यात तैनात आहेत.

परमबीर सिंगांनी कसाबचा मोबाईल गायब केला – पठाण

26 नोव्हेंबर 2008 रोजी जेव्हा पोलिसांनी कसाबला गिरगाव चौपाटीवर अटक केली, तेव्हा त्यांचा बॅचमेट एनआर माली आणि त्यांचे पथक डीबी मार्ग पोलिसांनी दहशतवाद्याकडून एक फोन जप्त केला होता. तो मोबाईल हवालदार कांबळे यांच्या ताब्यात होते. पण डीआयजी सिंग यांनी तो त्याच्याकडून घेतला, असं पठाण यांनी सांगितलं.

शमशेर पठाण यांनी आरोप केला की कसाबचा फोन महत्त्वाचा होता कारण तो पाकिस्तानमधील त्याच्या हँडलर्सकडून ऑर्डर घेत होता. “त्या फोनच्या माध्यमातून भारतातील काही उच्चपदस्थ व्यक्तींचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता होती, ज्यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली होती आणि आपल्या देशावर हल्ला केला होता,” अशी माहिती पठाण यांनी टाईम्स या वृत्तसंस्थेला दिली. पुढे त्यांनी सांगितले की, नंतर मालीने तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त डी व्यंकटेशम यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी ते परत घेण्यास सांगितले. जेव्हा माली परमबीर सिंग यांच्याकडे आले तेव्हा ते त्यांच्यावर ओरडले आणि त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सांगितले. सेवानिवृत्तीनंतर आता या घटनेबाबत यांनी बोलण्याची हिंमत माली करत आहेत, असंही ते म्हणाले.

माली आणि पठाण हे 13 वर्षे गप्प का – मुख्य तपास अधिकारी

मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, “माली आणि पठाण हे 13 वर्षे गप्प का होते आणि कसाबच्या फाशीनंतरही. आम्ही पाच फोन जप्त केले होते; आम्ही कसाब किंवा त्याचा साथीदार अबू इस्माईल, जो मारला गेला होता, त्याच्याकडून एकही फोन जप्त करण्यात आला नाही. सर्व 10 दहशतवादी प्रत्येकी एक मोबाईल घेऊन गेले होते”.

परमबीर सिगांवर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाणार – पठाण

“मुंबई पोलीस जर परमबीर सिंगांवर कार्रवाई करणार नाही तर मी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार. मी अनेक महिन्यांपासून पत्र देऊन कार्रवाई करण्याची मागणी केली होती. मात्र काहीच कार्रवाई झालेली नाही. मात्र, आता परमबीर सिंग हे परत आले आहेत तर लगेच मुंबई पोलिसांनी कार्रवाई करणं अपेक्षित आहे”, असं पठाण म्हणाले.

“मी जुलै 2021 मध्ये पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. तेव्हा मला सांगितलं की चौकशी सुरू आहे. आता परमबीर सिंग हे समोर आले आहे. तर, मुंबई पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली पाहिजे. या प्रकरणात कुठलंही प्रोटेक्शन त्यानां नाही म्हणून लगेच अटक केली पाहिजे, अन्यथा तो कुठेही पळून जाऊ शकतात. त्यांनी केलेलं कृत्य देशद्रोह आहे. मला फक्त 2 % आशा आहे की परमबीर सिंगांवर पोलीस कार्रवाई करतील. कार्रवाई झाली नाही, तर न्यायालयात दाद मांगणार आणि जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कार्रवाई करावी अशी मागणी करणार”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

‘सर्वोच्च न्यायालयाचा आदर, न्यायालयाच्या आदेशानुसारच तपासासाठी हजर’, 7 तासाच्या चौकशीनंतर परमबीर सिंहांची प्रतिक्रिया

‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत, कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी

कालपर्यंत फरार परमवीरसिंह 7 महिन्यांनी मुंबईत प्रकट, आज गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.