महिलेला जीवे मारण्याची धमकी, आक्षेपार्ह पोस्ट, प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध अभिनेता साहिल खान आणि एका महिलेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा आणि त्या महिलेसह तिच्या कुटुंबाच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा या दोघांवर आरोप करण्यात आला आहे.

महिलेला जीवे मारण्याची धमकी, आक्षेपार्ह पोस्ट, प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण?
Sahil KhanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 8:09 AM

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता साहिल खान याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत एका महिलेविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा साहिल खानवर आरोप आहे. तसेच या महिलेच्या विरोधात सोशल मीडियावर कथित पोस्ट टाकून तिची बदनामी केल्याचा आरोपही साहिल खानवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी साहिल खानविरोधात एफआयआर नोंदवून घेतला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे साहिल खानच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील एका 43 वर्षीय महिलेला धमकावणे आणि सोशल मीडियावर तिच्याविरोधात आपत्तीजनक पोस्ट टाकण्याचा आरोप साहिल खानवर ठेवण्यात आला आहे. ही महिला ओशिवरा येथे राहणारी आहे. फेब्रुवारी 2023मध्ये एका जीममध्ये तक्रारदार महिलेचा एका महिलेसोबत पैशावरून वाद झाला होता. यावेळी साहिल खान आणि सदर महिलेने तक्रारदार महिलेशी गैरव्यवहार केला. साहिल खानने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच या दोघांनी तिच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टही टाकली होती.

हे सुद्धा वाचा

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीने साहिल खान आणि त्याचा साथीदार मतिंडा यांनी लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी साहिल खान आणि मतिंडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे, या प्रकरणाशी संबंधित सर्व चॅट्स, पत्रे आणि कॉल्सची छाननी सुरू आहे. पीडित महिलेचा शोध सुरू आहे. परंतु आरोपी ना संपर्कात आहे ना घरी आहे. सध्या त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस काय म्हणाले?

मंगळवारी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी ही महिला आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी महिलेचे तक्रारदार महिलेच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अभिनेता साहिल खानविरुद्ध आयपीसी कलम 500, 501, 509, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेला धमकावणे, धमकी देणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याने दिली आहे.

बॉलिवूडमध्ये चमकला

साहिल खानने अनेक हिंदी सिनेमात काम केलं आहे. स्टाइल, एक्सक्यूज मी, अलादिन और रामा : द सेव्हियर आदी सिनेमात तो चमकला होता. सध्या तो फिल्मी दुनियेपासून दूर असून त्याच्या व्यवसायात व्यस्त आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.