Mumbai Crime: बायकोच्या संमतीनेच ‘थ्रीसम’! अखेर नवऱ्याला जामीन, कोर्टाचा मोठा दिलासा, नेमकं काय घडलं?

2018 साली या प्रकरणातील आरोपी पुरुष आणि तक्रारदार महिलेचं एकमेकांशी लग्न झालं होतं

Mumbai Crime: बायकोच्या संमतीनेच 'थ्रीसम'! अखेर नवऱ्याला जामीन, कोर्टाचा मोठा दिलासा, नेमकं काय घडलं?
पीएफआय प्रकरणातील संशयित आरोपींच्या कोठडीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 12:30 AM

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) एका प्रकरणी पतीला दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. तब्बल सहा महिन्यांच्या अटकेनंतर या पतीला मुंबई सत्र न्यायालयानं जामीन (Bail from Mumbai Session Court) दिला. पत्नीच्या संमतीने थ्रीसम केला जात असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवल्यानंतर या पतीला अखेर जामीना मंजूर करत दिलासा देण्यात आलाय. पती पत्नीसोबत आणखी एक व्यक्ती त्यांच्या लैंगिक आयुष्यात (Physical Relations after marriage) असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं. शारीरीक संबंधात तिघेजण एकावेळी सहभागी होते आणि याला पत्नीची संमती होती, असं कोर्टाच्या निरीक्षणात आढळून आलं आहे. हे सगळं प्रकरण कोर्टात नेमकं कोणत्या कारणामुळे गेलं आणि तब्बल सहा महिने पतीला जामीन मिळायला का लागला, हेही आता समोर आलंय.

काय आहे नेमकं प्रकरण?

ज्या व्यक्तीला आता मुंबई सत्र न्यालायाने जामीन देत दिलासा दिलाय, त्या व्यक्तीच्या पत्नीनं पोलिसात तक्रार केली होती. लैंगिक आयुष्याला आपण कंटाळले असून पती आपल्याला इतरांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप पत्नीने केला होता. डेटिंग वेबसाईट्सवरुन पती इतरांसोबत शारीरीक संबंध ठेवण्यास मला भाग पाडत होता, असा गंभीर आरोप पत्नीने केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली होती. अखेर हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टात पतीनं आपल्याला जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर सहा महिन्यानंतर पतीने नेमका असा कोणता युक्तिवाद केला, की ज्यामुळे अखेर मुंबई सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला? हे ही जाणून घेणं गरजेचं आहे.

कोर्टात काय घडलं?

अटकेत असलेल्या पतीच्या वकिलांकडून कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. पत्नीच्या संमतीनेच थ्रीमस (एकावेळी तिघांनी लैंगिक संबंध ठेवणे) करण्यात आला होता, असं त्यांनी म्हटलं. पत्नीने दिलेल्या संमतीचा पतीशी संबंध नसून पतीने तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, असंही पतीच्या वकिलांनी म्हटलंय. पत्नीनं पोलिसांना दिलेल्या जबाबातही आपल्या संमतीने सगळं झालं असल्याचं म्हटलं होतं. ही बाबही वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही तिने आपल्या संमतीनेच संबंध ठेवल्याचंही वकिलांनी कोर्टाला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

2018 साली या प्रकरणातील आरोपी पुरुष आणि तक्रारदार महिलेचं एकमेकांशी लग्न झालं होतं. याप्रकरणाती सहआरोपीला आधीच जामीन मिळालेला होता. तर मुख्य आरोपी असलेल्या पती जामीनासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होते. आता या प्रकऱणाचा तपास पूर्ण झाला आहे तसंच आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यातून अनेक गोष्टी अजूनही अस्पष्ट असून या प्रकरणाचा न्यायनिवाडा व्हायला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक वेळ मुख्य आरोपीला तुरुंगवास भोगावा लागू शकते. अशा स्थितीत आरोपी जामीनावर सुटण्यास पात्र आहे, असंही कोर्टानं यावेळी नमूद करत पतीला दिलासा दिला आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.