मुंबई : दिवसाढवळ्या एका मुलीवर हल्ला (Attack on girl in Wadala) करण्यात आला. माथेफिरुने चाकूनं सपासप वार करण्याच्या हेतून मुलीच्या दिशेने धाव घेतली. प्रसंगावधान राखत पोलिस मध्ये पडला. चाकूचे सपासप होणारे वार आपल्या अंगावर झेलले आणि जीवाची बाजी लावत मुलीचा जीव वाचवला. ही थरारक घटना घडली आहे, मुंबईतल्या वडाळ्यात (Wadala Police CCTV Video). मुंबई पोलीस (Mumbai Police) या घटनेत जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र जे धाडस पोलीस कर्मचाऱ्यानं दाखवलं, ते पाहून काळजाचा ठोका चुकेल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या हाताल जबर जखम झाली होती. हातातून मोठ्या प्रमाणात धारदार सुऱ्यामुळे झालेल्या घावाने रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान, वडाळा पोलीस स्थानकाती या पोलीस कर्मचाऱ्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.
मुंबईच्या वडाला भागात थरार पाहायला मिलाला. वडाळ्याच्या बरकत अली नाक्यावर एका मुलीवर माथेफिरुनं हल्ला केला. चाकू घेऊन एक इसम मुलीवर हल्ला करण्याच्या इराद्यानं निघाला होता. मुलगी हल्लेखोरापासून दूर पळत होती. हे पाहून तिथे असलेल्या पोलिसानं तातडीनं मुलीच्या दिशेनं धाव घेतली. मुलीचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या या मुलीला हल्लेखोराच्या तावडीतून पोलिसानं बाजूला केलं.
इतक्यात माथेफिरु हल्लेखोरानं पोलिसवरच धारदार चाकूनं सपासप वार केले. यात पोलिसांच्या हाताला जबर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पण या मुलीचा जीव वाचवण्यात पोलिसाला यश आलं. हल्ल्याची ही घटना पाहून आजूबाजूचे लोकही मुलीच्या दिशेनं धावले. एकच गर्दी झाली.
हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव अनिल बाबर असल्याचं कळतंय. त्याचं वय 31 वर्ष आहे. हल्ला करण्यात आलेल्या मुलीवर त्यांच प्रेम होतं. प्रेमप्रकरणातूनच अनिलने हा हल्ला केला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
#Video | वडाळ्यातील थरारक घटना, मुलीचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोराचे वार पोलिसांने अंगावर झेलले, मुंबई पोलिसांचं धाडस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सुदैवानं हल्ल्यातून मुलगी बचावली, पोलिसाच्या हाताल जखम #MumbaPolice #Wadala @MumbaiPolice #cctvfootage #cctv pic.twitter.com/tkdbYVwBP3
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2022