Mumbai Fire : कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्तांची चौकशी समिती स्थापन, 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने ते अडकून पडले होते. अशा स्थितीत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली मुंबई अग्निशमन दलाने इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यावरून सुमारे 25 ते 26 रहिवाशांची तातडीने सुटका करून त्यांना उपचारार्थ विविध रुग्णालयात दाखल केले.

Mumbai Fire : कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्तांची चौकशी समिती स्थापन, 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश
कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्तांची चौकशी समिती स्थापन
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 12:44 AM

मुंबई : ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाजवळ कमला इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत होरपळून सहा नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर अन्य 23 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने उपायुक्त (परिमंडळ 2) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई शहरातील ताडदेव परिसरात भाटिया रुग्णालय लगत दादाजी जावजी मार्गावर, 20 मजली रहिवासी स्वरूपाची कमला इमारत आहे. या इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर शनिवारी सकाळी 7.25 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती महानगरपालिकेला प्राप्त झाली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ 13 फायर इंजिन, 8 जम्बो टॅंकर, उंच शिडीची वाहने, नियंत्रण कक्ष वाहन आणि इतर आवश्यक साधनसामुग्री घटनास्थळी रवाना केली. तसेच रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या. (Municipal Commissioner set up inquiry committee in Kamla building accident case)

आग आणि धुरामुळे नागरिक आत अडकले

आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने ते अडकून पडले होते. अशा स्थितीत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली मुंबई अग्निशमन दलाने इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यावरून सुमारे 25 ते 26 रहिवाशांची तातडीने सुटका करून त्यांना उपचारार्थ विविध रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती महानगरपालिका सहानुभूती व्यक्त करीत आहे.

महापालिका आयुक्तांचे समिती स्थापन करुन अहवाल देण्याचे निर्देश

आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमण्याचे आणि पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ 2) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा देखील समावेश आहे. आगीचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

इमारतींच्या विद्युत परिश्रणाबाबत काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती

दरम्यान, मुंबई महानगरातील बहुमजली आणि उंच इमारतींची संख्या तसेच आगीच्या अलीकडील काही दुर्घटना लक्षात घेता या इमारतींचे नियमितपणे विद्युत विषयक परीक्षण करण्यासंदर्भात तसेच विद्युत संरचनेत बदलामुळे होणाऱ्या आधीच्या घटना रोखण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेतली होती.

महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (विकास नियोजन), प्रमुख अग्निशमन अधिकारी, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), महाराष्ट्र शासनाचे प्रमुख विद्युत निरीक्षक यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. केंद्रीय विद्युत नियमन 2010 मधील कलम 36 अन्वये, 15 मीटर आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या सर्व उंच इमारतींचे, विद्युत निरीक्षकांच्या माध्यमातून नियमितपणे विद्युत परीक्षण करण्यासंदर्भात यावेळी सांगण्यात आले होते आणि त्यास मुख्य विद्युत निरीक्षकांच्या प्रतिनिधींनी संमती देखील दर्शवली होती.

महापालिका वेळोवेळी परीक्षण करते

महानगरपालिका देखील वेळोवेळी उंच बहुमजली इमारतींमधील मंजूर आराखड्यानुसार संरचना आणि अग्नी शमन उपाययोजना व यंत्रणा यांचे वेळोवेळी स्वतःहून परीक्षण करीत असते. अशा परीक्षणामध्ये अग्निशमन उपाययोजना व यंत्रणा यामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाते. 18 नोव्हेंबर 2021 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये महानगरपालिकेने 223 बहुमजली उंच इमारतींचे परीक्षण करून त्यांना ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन रक्षण उपाययोजना अधिनियम 2006’ अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. अग्निशमन उपाय योजना यंत्रणा व साधनांचे योग्य रीतीने परिरक्षण न करता त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या नोटिसा दिल्या आहेत. (Municipal Commissioner set up inquiry committee in Kamla building accident case)

इतर बातम्या

Mumbai fire : धक्कादायक! आगीत होरपळलेल्यांना तीन रुग्णलयांनी उपचार नाकारले! महापौरांचे चौकशीचे आदेश

Fire Audit : मुंबईतील किती इमारतींचं फायर ऑडिट झालंय? माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.