Navneet Rana Breaking : 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर! पाहा EXCLUSIVE Video

तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर आल्या आहेत.

Navneet Rana Breaking : 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर! पाहा EXCLUSIVE Video
नवनीत राणा अखेर जेलबाहेरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 2:49 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची (Navneet Rana) कारागृहातून सुटका झाली आहे. भायखळा जेलमधून (Byculla jail) नवनीत राणा लिलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या. नवनीत राणांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर आल्या आहेत. मात्र जेलमध्ये असताना त्यांची तब्बेत बिघडल्याचं समोर आलंय. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणारच, अशी घोषणा केलेल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात काही दिवस चर्चेचे विषय ठरलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, या दाम्पत्याची आज अखेर जामिनावर सुटका करण्यात आली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर, आज त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जामीन (Navneet Rana Released from Jail News) मिळाल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. जेमधून सुटका झाल्यानंतर नवलनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

का झालेली अटक?

राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला होता. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकही आक्रमक झाले होते. त्यानंतर अमरावतीतून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले खरे, मात्र पंतप्रधआन नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे कारण देत त्यांनी मातोश्रीवर येणे टाळले होते. त्यानंतर त्यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही सरकारच्या वतीने दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना नोटिसीशिवाय अटक करण्यात आल्यावरुनही वाद झाला होता.

अटकेनंतरही वाद

तुरुंगातही त्यांना पोलिसांनी योग्य वागणूक दिली नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर अखेरीस गृहमंत्र्यांना स्पषअटीकरण द्यावे लागले होते. हे प्रकरण थेट लोकसभा अध्यक्षांपर्यंतही पोहचले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य ११ दिवस जेलमध्ये होते. आता १२ व्या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नवनीत राणांना आणखी एक दिलासा

दरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्राच्या वादात, नवनीत राणा यांच्याविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती, ती आता जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या वर्षी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने फेटाळले होते. त्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आहे. जर हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही ग्राह्य धरला तर त्यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ :

जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा रुग्णालयात तपासणीसाठी रवाना :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.