समीर वानखेडेंची आणखी एक धडाकेबाज कामगिरी, थेट दाऊदच्या भावाला बेड्या
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला (Iqubal Kaskar) एनसीबीनं (NCB) अटक केली आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणी एनसीबी इक्बाल कासकरची चौकशी करणार आहे.
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला (Iqubal Kaskar) एनसीबीनं (NCB) अटक केली आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणी एनसीबी इक्बाल कासकरची चौकशी करणार आहे. काश्मीर येथून मोठ्या प्रमाणात हशीश मुंबई आणून त्याची विक्री होत होती. या रॅकेटवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. ड्रग्ज रॅकेट प्रकरणी चौकशीसाठी इक्बाल कासकर याला अटक करण्यात आली आहे. (NCB arrested Underworld don Dawood Ibrahim brother Iqubal Kaskar for Mumbai drugs case under leadership of Sameer Wankhede)
इक्बाल कासकरवर कोणता आरोप?
इक्बाल कासकरवर एनसीबीनं जम्मू काश्मीरमधून पंजाबमध्ये 25 किलो ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. हे ड्रग्ज मुंबईत देखील विकण्यात आलं होतं. एनसीबीनं काश्मीरमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा तपास केला असता या कारवाईतून या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच संबंध असल्याचं उघड झालं. आता इकबाल कासकर याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इकबाल कासकर याचं अटक वॉरंट कोर्टाकडून मिळवल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.
ठाणे जेलमधून अटक
इक्बाल कासकरवर मनी लाँडरिंग प्रकरणी यापूर्वीच ईडीनं कारवाई केली आहे. इक्बाल कासकरवर महाराष्ट्रातील एका अग्रणी बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्बाल कासकरनं उत्तर मुंबईतील एका बिल्डरकडे तीन कोटी रुपये मागितल्याचं प्रकरण देखील समोर आलं होतं.
इक्बाल कासकर सध्या ठाणे येथील तुरुंगात होता. एनसीबीला त्याची चौकशी करायची असल्यानं त्याला ठाण्यातील तुरुंगातून एनसीबी ऑफिसमध्ये आणण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केल्यानंतर इक्बाल कासकर याच्यापर्यंत धागेदोरे पोहोचले होतो.
संबंधित बातम्या:
90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत
ड्रग्स केक बेकरी प्रकरणात आरोपीला अटक, आफ्रिकन नागरिकाला ड्रग्ज पुरवणारा रिक्षाचालकही गजाआड
बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा
NCB arrested Underworld don Dawood Ibrahim brother iqubal Kaskar for mumbai drugs case under leadership of Sameer Wankhede