AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरच्या ड्रग्ज बेकरीचा पर्दाफाश, केकमधून ड्रग्जचा पुरवठा, समीर वानखेडेंची धडाकेबाज कारवाई

समीर वानखेडे यांना ड्रग्स बेकरी बाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी काल आपल्या पथकासह बेकरीवर धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.

डॉक्टरच्या ड्रग्ज बेकरीचा पर्दाफाश, केकमधून ड्रग्जचा पुरवठा, समीर वानखेडेंची धडाकेबाज कारवाई
समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 4:52 PM

मुंबई : केकमध्ये ड्रग्स मिसळून ड्रग्स केक (Drug cake) विकणाऱ्या एकाला NCB ने अटक केली आहे. महत्त्वाचा म्हणजे हा व्यक्ती व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याच्या घरात त्याने बेकरी बनवली होती. त्यात तो ड्रग्स केक बनवत होता. या बेकरीतून 10 किलो ड्रग्स केक जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) यांनी ही कारवाई केली आहे.

समीर वानखेडे यांना ड्रग्स बेकरी बाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी काल आपल्या पथकासह बेकरीवर धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. केकच्या स्वरूपात असलेलं सुमारे 10 किलो हशीस हे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. माझगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

या ड्रग्स प्रकरणात रहमीन चरनिया या आरोपीला अटक करण्यात आली असून रहमीन हा व्यवसायाने डॉक्टर आहे. हा आपल्या बेकरीत ड्रग्सचा वापर करून वेगवेगळे केक बनवायचा.

रेनबो केक – यामध्ये चरस , गांजा आणि हशीस असायचं

हॅश ब्रावनी – हशीस असायचं

पोर्ट ब्रावनी – यात गांजा असायचा

या प्रकारचे केक रहमीनच्या बेकरीत ठेवले जात होते.

डॉक्टर रहमीनकडून एक लाख 70 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. डॉक्टर रहमीनच्या चौकशीत आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलं. त्याचं नाव रमजान शेख असून एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यालाही दक्षिण मुंबईतून अटक केली. रमजान हा सप्लायर होता. याच्याकडे 50 ग्राम हशीस जप्त करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या 

मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ

BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.