एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अँक्शन मोडमध्ये; मुंबईत चार कोटी हेरॉईन जप्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्गो कॉम्प्लेक्सच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे पार्सल वडोदरा येथे पोहोचवले जाणार होते, मात्र मुंबईतच ते जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुजरातमधील कृष्णा मुरारी प्रसाद यास ताब्यात घेण्यात आले आहे.

एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अँक्शन मोडमध्ये; मुंबईत चार कोटी हेरॉईन जप्त
एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अँक्शन मोडमध्ये
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 9:29 PM

मुंबई : एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अँक्शन मोडमध्ये आले आहेत. एनसीबीच्या टीमने अंधेरी परिसरातून 700 ग्राम हिरोईन जप्त केलं आहे. NCB ने मुंबईतील अंधेरी भागातील सहार इंटरनॅशनल एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून हेरॉईन हस्तगत करण्यात आले आहे. कुरिअर पार्सलमधून मुंबईत सापडलेल्या या खेपेत सुमारे 700 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्गो कॉम्प्लेक्सच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे पार्सल वडोदरा येथे पोहोचवले जाणार होते, मात्र मुंबईतच ते जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुजरातमधील कृष्णा मुरारी प्रसाद यास ताब्यात घेण्यात आले असून एनसीबी कार्यालयात त्याची चौकशी सुरु आहे. मुंबईत एनसीबीकडून ड्रग्जविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये एनसीबीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशीही केली आहे. त्याचबरोबर अनेक बड्या सेलिब्रिटींनाही अटक करण्यात आली आहे.

वानखेडेंवरील आरोपांनंतर एनसीबीची कारवाई थंडावली होती

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. क्रूझ ड्रग पार्टीवर कारवाई करीत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 11 जणांना अटक केले होते. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्याचबरोबर एनसीबीवर अन्य बोगस कारवायांचाही आरोप करण्यात आला होता. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई थंडावल्याचं चित्र दिसत होतं. मात्र आता पुन्हा एनसीबी सक्रिय झाली असून सहार एअरपोर्टवर हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. (NCB zonal director Sameer Wankhede back in action mode; Four crore heroin seized in Mumbai)

इतर बातम्या

क्रूझ ड्रग प्रकरणाला नवे वळण; शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.