AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 8:17 AM

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रातील क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर छापेमारी केली. यावेळी 22 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये एका बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. एनसीबी पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पुन्हा एकदा ही दमदार कामगिरी केली आहे.

एनसीबीने रेव्ह पार्टी सुरु असलेल्या क्रूझवरुन अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची कसून चौकशी सुरु आहे. यामध्ये एका बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलासोबतच आयपीएस अधिकाऱ्यालाही ताब्यात घेतलं गेल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही अॅडिशनल सीपी दर्जाची अधिकारी आहे.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.

समीर वानखेडेंचा क्रूझवर प्रवेश कसा

त्यानुसार अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रूझवर दाखल झाले होते. क्रूझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली.

क्रूझ मुंबईच्या दिशेने वळवली

पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कपड्यांमधून ड्रग्ज आणले

पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रेव्ह पार्टीत बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा

या रेव्ह पार्टीत बॉलिवूडमधील सुपरस्टारचा मुलगाही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, ही माहिती खरी असल्यास मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची रात्रभर कसून चौकशी केली आहे. रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज कसे आणि कुठून आणले, याविषयी संबंधितांना विचारणा करण्यात आली. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली.

संबंधित बातम्या :

मुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.