अंबरनाथ : रागाच्या भरात माणसं काहीही करु शकतात. अगदी एकमेकांच्या जीवावरही उठू शकतात. पण त्यातून समस्या सुटणार नाही. उलट त्याने भविष्यातील अडचणी आणखी वाढतील. त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळायला हवी. पण हल्ली संयम फार कमी माणसांकडे दिसतो. संयम सुटल्याने फार मोठं नुकसाण होतं. त्याचा प्रत्यय अंबरनाथ शहरात बघायला मिळाला आहे. अंबरनाथमध्ये सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सोसायटीतच राहणाऱ्या एका सदस्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संबंध प्रकार सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे.
संबंधित घटना ही अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया या उच्चभ्रू सोसायटीत आज (11 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यात सोसायटीचे सदस्य राकेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कृष्णा रसाळ आणि त्यांच्या दोन मुलांनी हल्ला केल्याची माहिती आता समोर आली आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या हल्ल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील आणि या घटनेत ज्यांची चुकी आहे त्यांच्यावर कारवाई करतील, अशी आशा काही स्थानिकांनी केली आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
पाण्यावरुन वाद, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून प्राणघातक हल्ला, अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक घटना, हाणामारी सीसीटीव्हीत कैद #cctv #Crime #Ambernath pic.twitter.com/VbpfhiWLzB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
दुसरीकडे औरंगाबादेत प्राध्यापकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा चिरुन हाताच्या नसा कापत अत्यंत क्रूर पद्धतीने प्राध्यापकाची हत्या करण्यात आली. 24 तासात हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. औरंगाबादमध्ये प्राध्यापक डॉक्टर राजन हरिभाऊ शिंदे यांची हत्या करण्यात आली. शहरातील ठाकरेनगर भागात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. डॉ. शिंदेंचा गळा चिरुन, त्यांच्या हाताच्या नसा कापत अत्यंत क्रूर पद्धतीने प्राध्यापकाची हत्या केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, गेल्या 24 तासात हत्येच्या दोन घटना उघडकीस आल्यामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. वाईन शॉपीवर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली होती. औरंगाबादच्या सिडको एन-8 परिसरातील विश्वास वाईन शॉपी समोर हा प्रकार घडला होता.
हेही वाचा :
आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला, जामीन पुन्हा फेटाळला, आता 13 ऑक्टोबरला सुनावणी
घरजावई असल्यावरुन टोमण्यांचा कंटाळा, 21 वर्षीय पत्नीसह सासूची गोळ्या झाडून हत्या