भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमबीर सिंग NIA चे आरोपी नाहीत; नवाब मलिकांचं टीकास्त्र

Nawab Malik | NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या 'डील' मुळे NIA ने परमबीर सिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपसोबत 'डील' केल्यानेच परमबीर सिंग NIA चे आरोपी नाहीत; नवाब मलिकांचं टीकास्त्र
nawab malik and paramvir singh
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 12:13 PM

मुंबई: तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हिरेन मनसुख हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमबीर सिंग यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमबीर सिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला लाच दिल्याचा आरोप

दुसरीकडे, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) अहवालात छेडछाड करण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सायबर तज्ज्ञाला 5 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला आहे. एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंद संघटनेचं नाव अहवालात घुसवण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिल्याचा आरोप आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एक मोठा कट असून आणखी काही संशयित असल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे. परमबीर सिंग यांनी ज्या सायबर तज्ज्ञाकडून रिपोर्ट बनवून घेतला, तो सीपी मुंबई या ऑफिशियल मेल आयडीवर मी पाठवला, असं सायबर तज्ज्ञाने जबाबात म्हटलं आहे.

सायबर तज्ज्ञाची दिशाभूल केल्याचा दावा

परमबीर सिंग यांनी या सायबर तज्ज्ञाला विश्वासात घेण्यासाठी हे ऑफिशियल आणि खूप कॉन्फिडेनशीयल काम आहे. यासंदर्भात मी एनआयएच्या आयजींशीही बोलणार आहे असं सांगितलं होतं. दिल्लीतल्या इस्राईल एम्बसीसमोर झालेला ब्लास्ट ज्या पद्धतीने दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्याची पाळंमुळं तिहार जेलमध्ये सापडली त्यावरुनच असाच अहवाल तयार करण्यासाठी परमबीर यांनी सायबर तज्ज्ञाला सांगितल्याची माहिती आहे.

सचिन वाझे पुन्हा स्कॉर्पिओजवळ का?

ज्या दिवशी स्फोटकांची गाडी अँटिलिया परिसरात ठेवण्यात आली, त्या दिवशी सचिन वाझे दुसऱ्यांदा स्कॉर्पिओजवळ का गेला, याचं कारण आरोपपत्रात देण्यात आलं आहे. पोलीस आयडी कार्ड स्कॉर्पिओ गाडीत राहिलं, असं सचिन वाझेला वाटलं. म्हणून ते तपासण्यासाठी तो पुन्हा गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

सचिन वाझे मुख्यमंत्र्यांना ‘गंडवत’ होता, मनसुखप्रकरणात खोटी माहिती दिली : NIA

सचिन वाझेसोबत 5 स्टारमध्ये दिसलेली ‘मिस्ट्री वूमन’ वेश्या, ‘एनआयए’ला महिलेचाच जबाब

अँटिलिया स्फोटक प्रकरणात ‘जैश-उल-हिंद’चं नाव घुसवा, परमबीर सिंह यांची सायबर तज्ज्ञाला लाच?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.