Palghar Accident : एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक! विक्रमगड मनोर मार्गावर भीषण अपघात, 5 प्रवासी जखमी
Palghar News : केव फाट्यापासून अवघ्या काही अंतरावरच एसटी बसचा अपघात झाला. एका स्टॉपवरुन एसटी बसमध्ये प्रवासी चढले. त्यानंतर एसटी बस निसरड्या रस्त्यावर असताना चालकाने ब्रेक मारला. यावेळी एसटीची चाके घसरुन एसटी समोरुन येणाऱ्या टेम्पोला जोराने धडकली.
पालघर : पालघरमध्ये एसटी बस (ST Bus Accident) आणि ट्रकची (Palghar accident) जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये पाच प्रवासी जखमी झालेत. गुरुवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये चालकासह पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पालघरवरुन अमळनेरकडे (Palghar Amalner ST Bus) एसटी बस जात होता. त्यावेळी मनोर विक्रमगड रस्त्यावर केव फाट्यावर काही प्रवासी नुकतेच चढले होते. यानंतर बस पुढे निघाली असताना थोड्याशा अंतरावरसच एसटी बस आणि ट्रक यांच्यांत जबरदस्त धडक झाली. या अपघातामध्ये एसटी बससह ट्रकचं मोठं नुकसान झालं. एसटी बसचा समोरची काचही अपघातात फुटली होती. तर ट्रकच्या उजव्या बाजूच्या भागाल जबर मार बसला होता. सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घाडला.
निसरड्या रस्त्यामुळे अपघात..
केव फाट्यापासून अवघ्या काही अंतरावरच एसटी बसचा अपघात झाला. एका स्टॉपवरुन एसटी बसमध्ये प्रवासी चढले. त्यानंतर एसटी बस निसरड्या रस्त्यावर असताना चालकाने ब्रेक मारला. यावेळी एसटीची चाके घसरुन एसटी समोरुन येणाऱ्या टेम्पोला जोराने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात एसटी बस आणि ट्रक दोन्ही अक्षरशः चेपून गेले होते.
अपघातग्रस्त एसटीमध्ये विक्रमगड जव्हारच्या दिशेने जाणारे तीस प्रवाशी प्रवास करत होते. गुप्ता क्रशर मशीनमधून निघणाऱ्या वाहनांमुळे वळणावरच्या रस्त्यावर चिखल माती आल्याने रस्ता निसरडा झालाय. त्यामुळे हा अपघात घडला, असे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगा या मार्गावर लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यास सुरुवात केली.