Mumbai Crime : दिवसभर रेकी आणि रात्री घरफोडी, मुंबईत सराईत चोरट्यांना अटक

पोलीस शिपाई सवळी हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना एक्सर तलाव परिसर, एक्सरगाव, बोरिवली (प) येथे दोन इसम हे संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आले. पोलीस पथकाने गस्तीचे वाहन थांबवून त्यांची चौकशी करण्याकरता दोन्ही इसमांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर पोलीस पथकाने दोघांना घेराव घालून ताब्यात घेतले.

Mumbai Crime : दिवसभर रेकी आणि रात्री घरफोडी, मुंबईत सराईत चोरट्यांना अटक
दिवसभर रेकी आणि रात्री घरफोडी, मुंबईत सराईत चोरट्यांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 2:41 PM

मुंबई : मुंबई शहरातील विविध भागात दिवसभर घराची रेकी करून घरफोडी (Burglary) करणाऱ्या दोन आरोपींना एमएचबी पोलिसांनी अटक (Arrest) करण्यात केले आहे. या आरोपींनी आतापर्यंत एकूण 35 ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. आरोपींकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने (Jewellery), तसेच रोख रक्कम देखील हस्तगत केली आहे. यासिन शौकत अन्सारी आणि जमिल अहमद हुसेन अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. आरोपींनी एमएचबी, कांदिवली, बोरिवली, मीरा रोड, ठाणे, भाईंदर अशा विविध भागात चोरी केल्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गस्तीवर असताना पोलिसांना दोन इसम संशयास्पद फिरताना दिसले

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरिक्षक संदीप साळवे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक खोत, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई आहिरे, पोलीस शिपाई सवळी हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना एक्सर तलाव परिसर, एक्सरगाव, बोरिवली (प) येथे दोन इसम हे संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आले. पोलीस पथकाने गस्तीचे वाहन थांबवून त्यांची चौकशी करण्याकरता दोन्ही इसमांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर पोलीस पथकाने दोघांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पंचांना बोलावून दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक 9 इंच लांबीचा हिरव्या मुठीचा स्क्रू ड्रायव्हर, फोल्डिंगची दिड फूट लांबीची कटावणी, एक अॅडजस्टेबल पान्हा अशी हत्यारे मिळून आली. त्याचा पंचनामा करुन दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

दोघांना सदर ठिकाणी फिरण्याचा उद्देश विचारला असता आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच एमएचबी पोलीस ठाणे हद्दीत दहिसर, बोरीवली व मुंबईत इतर ठिकाणी घरफोडी करण्याकरता आल्याचे त्यांनी कबूल केले. जप्त केलेली हत्यारे ही घरफोडी करण्यासाठी बाळगल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्यांच्यावर एकूण 35 घरफोडीचे गुन्हे नोंद असल्याचे दिसून आले. नमूद अटक आरोपींनी संगनमत करून एमएचबी पोलीस ठाणे हद्दीत एकूण 5 घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले असून गुन्ह्यातील काही मालमत्ता पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई शहरात घरफोडी आणि चोरी असे गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. 35 घरफोडी केलेल्या सराईत ईसमांना एम एच बी कॉलनी पोलीसांकडून अटक मा.पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी केले त्याप्रमाणे अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग कांदिवली (पू), मुंबई तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ 11, मुंबई व सहायक पोलीस आयुक्त बोरिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व वपोनि सुधीर कुडाळकर, एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे यांच्या थेट देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक यांना याबाबत कारवाई करण्यास आदेशित केले आहे. (Police have arrested two accused of burglary in different area of Mumbai)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.