Mumbai Crime : अंधेरीतील डान्सबारवर पोलिसांच्या एसएस शाखेचा छापा, 18 मुली ताब्यात

एसएस शाखेच्या पथकाने 1 बार चालक, 1 बार मॅनेजर, 1 बार मॅन, 8 स्टुअर्ट वेटर्स, 2 ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट आणि 16 ग्राहकांवर देखील कारवाई केली आहे. यावेळी एसएस शाखेच्या पथकाने 77430 रुपये रोख, 1 अॅम्प्लीफायर, 1 लॅपटॉप, 1 स्पीकर व 01 मेमरी कार्ड जप्त केले आहे.

Mumbai Crime : अंधेरीतील डान्सबारवर पोलिसांच्या एसएस शाखेचा छापा, 18 मुली ताब्यात
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 11:00 PM

मुंबई : मुंबईतील आंबोली येथील डान्सबार (Dance Baar)वर पोलिसांच्या एसएस शाखेने छापा (Raid) टाकत 18 मुलींना ताब्यात घेतले. यासोबतच एसएस शाखेच्या पथकाने 1 बार चालक, 1 बार मॅनेजर, 1 बार मॅन, 8 स्टुअर्ट वेटर्स, 2 ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट आणि 16 ग्राहकांवर देखील कारवाई केली आहे. यावेळी एसएस शाखेच्या पथकाने 77430 रुपये रोख, 1 अॅम्प्लीफायर, 1 लॅपटॉप, 1 स्पीकर व 01 मेमरी कार्ड जप्त केले आहे. आंबोली परिसरात असलेल्या सदानंद (स्टार इन) डान्सबार येथे एसएस शाखेचे डीसीपी डॉ राजू भुजबळ (इन्फोर्समेंट) आणि एसीपी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कानवडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Police raids dance bar in Andheri, arrests 18 girls)

लातूरमध्ये घरावर छापा टाकून परप्रांतीय महिलांची सुटका

लातूर शहरातल्या स्वराज नगर भागात असलेल्या एका घरावर छापा टाकून पोलिसांनी इथं वेश्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे. तर या महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिलेसह पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वराज नगर भागातल्या एका घरात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला आहे.

अमरावतीत 10 किलो सोन्याचे दागिने जप्त

अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकून राजापेठ पोलिसांनी पाच कोटी किंमतीचे तबल 10 किलो सोन्याचे दागिने जप्त केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून हे सोने कुणाच्या मालकीची तेथे कसे आणले याचा तपास पोलीस करत आहेत. राधा कृष्ण अपारमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक 401 मध्ये काही इसम संशयास्पद असल्याची गुप्त माहिती मध्यरात्रीच पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे राजापेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व त्यांचे पथक व्हिडीओ कॅमेरा घेऊन या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्या फ्लॅटमध्ये राजस्थानमधील राजेंद्र सिंगसह अन्य दोन व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तींकडे बरेच व्यवहाराचे कागदपत्र देखील होते असेही पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितलं. या कारवाई दरम्यान पाच कोटी रुपयांचे 10 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने व पाच लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. (Police raids dance bar in Andheri, arrests 18 girls)

इतर बातम्या

Nagpur Crime : फिंगर प्रिंटच्या आधारे कुख्यात आरोपीला नागपूर पोलिसांकडून अटक

Wardha Drowned : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, दोन युवकांचा बुडून मृत्यू तर दोघे बचावले, हिंगणघाट तालुक्याच्या हिवरा येथील घटना

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.