Avinash Bhosale CBI Custody : पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना आज कोर्टाने दिलासा न देता 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. मात्र त्याचबरोबर गरज भासल्यास चौकशीसाठी भोसले यांना राज्याबाहेर नेण्याचीही सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे.

Avinash Bhosale CBI Custody : पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडीImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:48 PM

मुंबई : पुण्याचे व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टा (CBI Court)ने 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी (CBI Custody) दिली आहे. डीएचएफएल आणि येस बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अविनाश भोसलेंना अटक केली आहे. येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना आज कोर्टाने दिलासा न देता 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. मात्र त्याचबरोबर गरज भासल्यास चौकशीसाठी भोसले यांना राज्याबाहेर नेण्याचीही सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. याआधी भोसले यांना तीन दिवस सुनावनी दरम्यान नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले गेले होते. सोमवारी या प्रकरणात कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता.

येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या रिमांडवर आदेश दिले. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून डीएचएफएलला आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप आहे. यात येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्प-मुदतीच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3,983 कोटी गुंतवले होते. तसेच येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला त्यांच्या वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटी रुपयांचे आणखी कर्ज मंजूर केले होते.

सीबीआयने बेकायदेशीर कारवाई केल्याचा दावा फेटाळला

सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा अविनाश भोसले यांचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. गेल्या काही दिवसांपासून येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले सीबीआयच्या रडारवर होते. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयने अविनाश भोसले यांची 10 दिवसांकरता कोठडी मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत अविनाश भोसले यांच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली. रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. तसेच, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. (Pune businessman Avinash Bhosale remanded in CBI custody till June 8)

सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.