रेल्वे स्थानकावर सुट्या पैशांवरुन वाद, प्रवाशांकडून महिला क्लार्कला बेदम मारहाण

kalyan railway station: कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गोंधळ घातल्याची माहिती जीआरपी पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी काही फेरीवाले त्या ठिकाणी गोंधळ घालत होते. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वे स्थानकावर सुट्या पैशांवरुन वाद, प्रवाशांकडून महिला क्लार्कला बेदम मारहाण
kalyan railway station
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 5:05 PM

Kalyan Crime News : मुंबई उपनगर रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेक वेळा वाद होत असतात. तसेच रेल्वेच्या तिकीट काउंटरवरील खिडकीत असलेल्या रेल्वे क्लार्कशी काही जण वाद घालत असतात. परंतु वादामुळे एखाद्या रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यास मारहाण करण्याची मजल प्रवाशांची झाली आहे. कल्याणमधील रेल्वे स्थानकावर सुट्या पैशांवरुन काही प्रवाशांनी वाद घातला. त्या वादानंतर प्रवाशांनी महिला कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे.

मारहाणीत महिला गंभीर जखमी

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचा धक्कादायक राग दिसून आला. कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. उपनगर रेल्वेचे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला. या वादात प्रवाशांनी तिकीट बुकिंग क्लार्क रोशना पाटील यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रोशना पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपीने मारहाण करणाऱ्या आन्स्सर शेख याच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गोंधळ घातल्याची माहिती जीआरपी पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी काही फेरीवाले त्या ठिकाणी गोंधळ घालत होते. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेचे तिकीट क्लार्क अश्विनी शिंदे यांनी या प्रकारानंतर पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.