अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा?

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या हाती आता एक पीपीटी अर्थात पावर पॉईंट प्रेजेन्टेशन लागलं आहे.

अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा?
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 3:37 PM

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या हाती आता एक पीपीटी अर्थात पावर पॉईंट प्रेजेन्टेशन लागलं आहे. या पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये बॉलीफेम कंपनीकडून भविष्यात मिळणाऱ्या फायद्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राने बॉलीफेम सोबत चॅट करताना आपला प्लॅन बी देखील सांगितला होता. गूगल किंवा अ‍ॅपलने आपला हॉटशॉट्स अ‍ॅप बंद केला तर दुसऱ्या कोणत्या पर्यायाचा अवलंब करायचा याबाबत त्याने चॅट करताना सांगितलं होतं.

नेमका किती फायदा होणार होता?

क्राईम ब्रांचच्या हाती लागलेल्या पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये पुढच्या तीन वर्षांच्या फायद्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती. या प्रेजेन्टेशननुसार, 2021-22 या वर्षात 36 कोटी 50 लाख रुपयांचा ग्रॉस रेव्हेन्यू मिळणार होता. यापैकी 4 कोटी 76 लाख 85 हजार रुपयांचा फायदा होणार होता. तर 2022-23 या वर्षात तब्बल 73 कोटींचा ग्रॉस रेव्हेन्यू मिळणार होता. यामध्ये 4 कोटी 76 लाख 85 हजार रुपयांचा फायदा होणार होता. तर 2023-24 या वर्षात ग्रॉस रेव्हेन्यू हा तब्बल 14 कोटी 60 लाख इतका होणार होता. यातून 30 कोटी 42 लाख 1 हजार 400 रुपये इतका नफा मिळणार होता. पण ही कमाई नेमकी कोणत्या कंपनीचा असणार आहे, याबाबतचा उल्लेख त्यात करण्यात आलेला नाही. क्राईम ब्रांच आता याप्रकरणी अटकेत असलेला राज कुंद्रा आणि त्याचा माजी पीए उमेश कामत यांची एकांतात आणि समोरासमोरही चौकशी करु शकते.

पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये खर्चाचा देखील उल्लेख

या पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये पुढच्या तीन वर्षांच्या खर्चाबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. पण हा खर्च रुपयात नाही तर पाँडमध्ये सांगण्यात आला आहे, अशी माहिती आता समोर येत आहे. पीपीटी प्रेजेन्टेशनमध्ये असलेल्या माहितीनुसार 2021-22 या वर्षात 3 लाख पाँड खर्च येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर 2022-23 मध्ये 3 लाख 60 हजार पाँड तर 2023-24 या वर्षात 4 लाख 32 हजार पाँडचा उल्लेख करण्यात आला आहे.

राज कुंद्राच्या कस्टडीत 14 दिवसांची वाढ

अश्लील चित्रपट प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी वाढवण्यात आली आहे. दोघांची 14 दिवसांची कोठडी वाढवण्यात आली आहे. दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपणार होती. पण गुन्हे शाखेने कोर्टात पुन्हा कस्टडी मागून घेतली.  अजूनही बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर या दोघांची चौकशी करणे बाकी आहे, असं गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलं आहे.

राज कुंद्राने मोबाईल बदलला

अश्लील चित्रपट प्रकरण जेव्हा फेब्रुवारीमध्ये समोर आलं आणि त्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकरणातील प्रमुख राज कुंद्राने अनेक माहिती लपवण्यासाठी आपला मोबाईल फोन बदलून मार्च महिन्यात नवीन फोन घेतला होता. म्हणून सध्या या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या मोबाईल फोनमध्ये काय काय होतं, ते रिट्राईव्ह किंवा अर्काईव्ह करण्यासाठी फार मेहनत करावी लागत आहे. अनेक महत्त्वाचे डेटा पोलिसांच्या हाती लागणार नाहीत, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा :

Raj Kundra | राज कुंद्राची कस्टडी वाढवण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न, तर अटक बेकायदेशीर असल्याची हायकोर्टात याचिका

अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.