AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला, सचिन वाझेची जबाबात माहिती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रुपये वसुल करण्याचं टार्गेट api सचिन वाझे याला दिलं होतं, अशी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी न्या चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे.

अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला, सचिन वाझेची जबाबात माहिती
अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 10:30 PM

मुंबई : न्या. चांदीवाल आयोगात आज महत्वपूर्ण सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी सचिन वाझे याने आयोगाला एक निवेदन दिलं आहे. त्याद्वारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आयोगासमोर साक्षीसाठी बोलवावं, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे आपण परमबीर सिंग यांच्या नाही तर अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, असं सचिन वाझेने आपल्या साक्षीत सांगितलं.

वकील शेखर जगताप यांच्याकडून वाझेची उलटतपासणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रुपये वसुल करण्याचं टार्गेट api सचिन वाझे याला दिलं होतं, अशी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी न्या चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचं नियमित कामकाज सुरू आहे. काल आयोगाने सचिन वाझे याचा जबाब नोंदवला. त्यावर आज सचिन वाझे याची उलट तपासणी होती. यावेळी संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी त्याची उलट तपासणी केली.

अनिल देशमुख यांच्या सल्ल्यानुसार अर्ज करुन पुन्हा खात्यात रुजू

मी निलंबित असताना परमबीर सिंग यांना ते मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ही त्यांना अनेकदा भेटलो होतो. मला 5 जून 2020 रोजी पुन्हा खात्यात घेण्यात आलं. त्या आधी मी परमबीर सिंग यांच्यासोबत कधीही काम केलं नाही. त्याचप्रमाणे आपण निलंबित असताना पुन्हा खात्यात येण्याचा प्रयत्न करत होतो. यावेळी मला पुन्हा खात्यात यायचं असल्यास अर्ज करा, असा सल्ला तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता. त्यानुसार आपण अर्ज केला आणि खात्यात आलो, असंही सचिन वाझे यांनी आयोगाला सांगितलं.

पुढच्या आठवड्यात परमबीर सिंह प्रतित्रापत्र सादर करणार

तर साक्ष सुरू होण्यापूर्वी सचिन वाझे यांनी आयोगाला एक निवेदन दिलं. ही सर्व आयोगाची प्रक्रिया परमबीर सिंग यांच्या तक्रारीनुसार सुरू आहे. यामुळे त्यांना या आयोगासमोर यावं लागेल. त्यांना साक्षीसाठी बोलावण्यात यावं. आपण या प्रकरणात अपघाताने आलो आहोत. आपल्याला याबाबत काही माहिती नाही. परमबीर सिंग येथे आल्यास त्यांच्याकडून बरीच माहिती उघड होऊ शकते. ते अधिक पुरावे देऊ शकतात. आपण या प्रकरणातील एक छोटा व्यक्ती आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना आयोगासमोर बोलवाच, असा युक्तिवाद सचिन वाझे याचे वकील योगेश नायडू यांनी केला. मात्र, आता आम्हाला या प्रकरणात जास्त काही सांगायचं नाही. जे काही सांगायचं आहे ते सांगितलं आहे. याबाबत आम्ही पुढच्या आठवड्यात एक प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याच परमबीर सिंग यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. (Sachin Waze was cross-examined before the Chandiwal Commission today)

इतर बातम्या

Ambernath | राष्ट्रवादी शहराध्यक्षावर भावाचा हल्ला, मोबाईलच्या टॉवरवरुन वाद

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला चार वर्षाचा कारावास

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.