Mumbai Fraud : एअरपोर्टवर नोकरीला लावतो सांगून तरुणीची 73 हजाराची फसवणूक, आरोपीला अटक

मॅट्रीमोनी साईटद्वारे आरोपी अभिजीत परमेश्वर गाढवे याच्याशी फिर्यादीची ओळख झाली होती. या संकेतस्थळावर आरोपीने आपली ओळख आयपीएस अधिकारी अशी भासवत वडील रिटायर आर्मी ऑफिसर असल्याचं सांगितलं.

Mumbai Fraud : एअरपोर्टवर नोकरीला लावतो सांगून तरुणीची 73 हजाराची फसवणूक, आरोपीला अटक
एअरपोर्टवर नोकरीला लावतो सांगून तरुणीची 73 हजाराची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 9:12 PM

मुंबई : आयपीएस अधिकारी (Ips Officer) असल्याची बतावणी करून साकीनाका परिसरातील तरुणीची फसवणूक (Fraud) करणाऱ्या भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणाची एका मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाली होती. या भामट्याने तरुणीस एअरपोर्टमध्ये ऑफिसर पदावर नोकरी लावण्याचे बोगस प्रमाणपत्र देऊन 73 हजार रुपये देखील उकळले होते. याशिवाय खोटी कौटुंबिक माहितीही दिली होती. अभिजीत परमेश्वर गाढवे (26) फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभिजीतला साकीनाका पोलिसांनी घाटकोपर येथून अटक (Arrest) केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीने अजून किती मुलींची फसवणूक केलीय याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

तरुणी आणि आरोपीची मॅट्रीमोनी साईटवर झाली होती ओळख

मॅट्रीमोनी साईटद्वारे आरोपी अभिजीत परमेश्वर गाढवे याच्याशी फिर्यादीची ओळख झाली होती. या संकेतस्थळावर आरोपीने आपली ओळख आयपीएस अधिकारी अशी भासवत वडील रिटायर आर्मी ऑफिसर असल्याचं सांगितलं. शिवाय आपली सातारा येथे स्ट्रॉबेरीची शेती असल्याचे देखील म्हटले होते. यामुळे फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जवळीक वाढली. यानंतर मुंबई विमानतळावरील इंटर ग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीत ऑफिसर पदावर कामावर लावण्यासाठी 73 हजार 900 रुपये घेऊन आरोपीने संबंधित तरुणीला बोगस जॉइनिंग लेटर दिले. मात्र हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे ध्यानात येताच संबंधित तरुणीने या घटनेविषयी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली. साकीनाका पोलिसांनी आपल्या खबऱ्याच्या मार्फत आरोपीचा शोध घेऊन त्याला घाटकोपर परिसरातून अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास साकीनाका पोलीस करत आहेत. (Sakinaka police arrested the accused who cheated a young woman of 73 thousand in Mumbai)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.