शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…
आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. तो 23 वर्षांचा आहे. त्याने लहानपणीच काही बॉलिवूडपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.
NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली असून आर्यन खानच्या नावाला दुजोरा दिला. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. अरबाझ मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जवळचा मित्र आहे.
Eight persons — Aryaan Khan, Arbaaz Merchant, Munmun Dhamecha, Nupur Sarika, Ismeet Singh, Mohak Jaswal, Vikrant Chhoker, Gomit Chopra — are being questioned in connection with the raid at an alleged rave party at a cruise off Mumbai coast: NCB Mumbai Director Sameer Wankhede pic.twitter.com/KauOH2ULts
— ANI (@ANI) October 3, 2021
कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
कोणकोणत्या पदांवर काम
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली
2013 मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.
एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे, याचे कारण समीर वानखेडे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जी सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करत आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समीर वानखेडे एका मराठी अभिनेत्रीचे पती आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक सिनेमात झळकली आहे.
कोण आहे आर्यन खान?
आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. तो 23 वर्षांचा आहे. त्याने लहानपणीच काही बॉलिवूडपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये द लायन किंग, द इन्क्रेडिब्ल्स (हम है लाजवाब) यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. 2004 मध्ये त्याला हम है लाजवाब या अॅनिमेशनपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कारही मिळाला होता.
चित्रपटातून अभिनय
2001 मध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने शाहरुखच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 2006 मध्ये कभी अलविदा ना कहना सिनेमातही तो झळकला होता. लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतलं. तर युनिव्हर्सिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियामधून त्याने चित्रपट निर्मिती आणि लेखन विषयात पदवी मिळवली.
ताईक्वांदोमध्ये सुवर्ण
महाराष्ट्रातील ताईक्वांदो स्पर्धेत त्याला 2010 मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्याच्याकडे ब्लॅक बेल्ट असून मार्शल आर्ट्समध्येही तो प्रशिक्षित आहे. त्याला क्रीडा क्षेत्रातही विशेष रस आहे.
900 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती
2020 मध्ये आर्यनची संपत्ती 120 ते 140 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी आर्यन खानच्या नावाने एक एमएमएस व्हायरल झाला होता. यामध्ये आर्यन आणि बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन नव्यानवेली नंदा असल्याची चर्चा होती. मात्र नंतर तो व्हिडीओ फेक असल्याचं निष्पन्न झालं.
View this post on Instagram
क्रूझवर रेव्ह पार्टी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.
समीर वानखेडेंचा क्रूझवर प्रवेश कसा
त्यानुसार अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रूझवर दाखल झाले होते. क्रूझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली.
क्रूझ मुंबईच्या दिशेने वळवली
पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कपड्यांमधून ड्रग्ज आणले
पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संबंधित बातम्या :
कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?
शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई
RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी