Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली, एनसीबीतील कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया

गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे 1791 किलो 597 ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. तर ड्रग्स माफियांची सुमारे 11 कोटी 62 लाख 24 हजार 856 रुपयांची मालमत्ता फ्रीझ करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी सेवेतील शेवटच्या दिवशीही 31 डिसेंबर रोजी गोव्यात कारवाई केली आहे.

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली, एनसीबीतील कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया
समीर वानखेडे यांची चौकशी
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 5:55 PM

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अखेर मुदत वाढ नाकारण्यात आली आहे. यामुळे समीर वानखेडे हे आता आपल्या मूळ विभागात अर्थात कस्टममध्ये पुन्हा लवकरच रुजू होणार आहेत. समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर म्हणून एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होतं. मात्र, त्यांना आता मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.

वानखेडे यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ नाकारण्यात आली

वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ अखेर संपला. त्यांना तिसरी मुदतवाढ नाकारण्यात आली. यामुळे त्यांना आता त्यांच्या मूळ विभागात परत जावं लागणार आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा कार्यकाळ खूपच गाजला. मुंबईत सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण गाजत होतं. सुशांतला ड्रग्स दिल जात होतं, असा आरोप होत होता. या परिस्थितीत समीर वानखेडे यांची केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. समीर वानखेडे यांची नेमणूक 30 ऑगस्ट 2020 रोजी झाली.

सुरुवातीची ही नेमणूक सहा महिन्यासाठी होती. समीर वानखेडे हे कस्टम सेवेतील आहेत. त्यांना प्रतिनियुक्तीवर DRI मध्ये पाठवण्यात आलं होतं. मात्र तिथूनही त्यांना एनसीबीमध्ये लोनच्या रुपात आणण्यात आलं होतं. त्यांची सुरुवातीला सहा महिन्यांसाठी नियुक्ती होती. या काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या केसेस केल्यात. सुरुवातीलाच सुशांत सिंग प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांनी कारवाई सुरू केली. यावेळी रिया चक्रवर्तीसह सुमारे तीस जणांना अटक केली होती. भारती सिंग, दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश आदी अनेक फिल्मशी संबंधित व्यक्तींवर त्यांनी कारवाई केली.

वानखेडे यांच्या पाच कारवायांची नव्याने चौकशी होणार

यानंतर त्यांना पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 30 ऑगस्ट 2021 पर्यंत होती. या कालावधीत ही त्यांनी अनेक कारवाया केल्या. यानंतर त्यांना पुन्हा दुसरी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 अशी होती. या कालावधीत ही अनेक मोठ्या केसेस केल्यात. नवाब मलिक यांचे जावई समीर खान, शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान, अरमान कोहली आदी अनेक मोठ्या कारवाया केल्यात. मात्र याच कारवायामुळे ते नंतर अडचणीत आलेत. समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच कारवायांची पुन्हा नव्याने चौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यांची चौकशी सुरू झाली. आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप झाला होता. यामुळे मग समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत दोन विशेष पथक नेमण्यात आली आहेत. एक पथक आर्यन खान याला सोडण्यासाठी पैसे मागण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं तर दुसर पथक समीर वानखेडे यांनी केलेल्या पाच प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला होता.

वानखेडेंनी दीड वर्षात सुमारे 1791 किलो 597 ग्रॅम ड्रग्स जप्त केले

कार्डेलिया क्रूझ आर्यन खान कारवाई, समीर खान कारवाई, मुंब्रा ड्रग्स सीझर कारवाई, अरमान कोहली कारवाई, इकबाल कासकर कारवाई या पाच प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक नेमण्यात आलं होतं. या दोन्ही प्रकरणाची चौकशी वरिष्ठ आयपीएस अधिकारी करत आहेत. या चौकशा अजून पूर्ण झालेल्या नाहीत. दरम्यान, समीर वानखेडे हे गेली दिड वर्षं एनसीबीमध्ये होते. या काळात त्यांनी अनेक मोठ्या कारवाया केल्यात. गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे 1791 किलो 597 ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. तर ड्रग्स माफियांची सुमारे 11 कोटी 62 लाख 24 हजार 856 रुपयांची मालमत्ता फ्रीझ करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी सेवेतील शेवटच्या दिवशीही 31 डिसेंबर रोजी गोव्यात कारवाई केली आहे. (Sameer Wankhede transferred to DRI department, Several major actions during the tenure of the NCB)

इतर बातम्या

Ravi Pujari: छोटा राजनचा हस्तक सुरेश पुजारी विरोधात मुंबई एटीएसकडून नवीन गुन्हा दाखल

दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक; कुरार पोलिसांची कामगिरी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.