जयदीप आपटेच्या तपासासाठी सात पथके, कुटुंबही नरजकैदेत, पण आरोपीचा सुगावा…
Mumbai Crime Newsa: जयदीप आपटेचा शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आहे. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहे. परंतु अजूनही आपटे सापडला नाही.
मालवण येथील राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता. हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी पडला. त्यानंतर या पुतळ्याची निर्मिती करणारे शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चेतन आपटे याला अटकही झाली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. परंतु जयदीप आपटे अजूनही फरार आहे. पोलिसांची सात पथके त्याचा शोध घेत आहेत. परंतु पोलिसांना त्याचा थागंपत्ता लागत नाही. दुसरीकडे त्याचे कुटुंब ठाणे येथील घरी परतले आहे. ते सध्या पोलिसांच्या नजरकैदेत आहे. त्यांचीही सिंधुदुर्ग आणि कल्याण पोलिसांच्या पथकाने चौकशी केली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मालवण राजकोट किल्ल्यावरील 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला होता. यानंतर गुन्हा दाखल होताच शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे. त्याचे कुटुंब पोलिसांच्या नजर कैदेत आहे. सलग पाचव्या दिवशी देखील जयदीप आपटे यांच्या घराबाहेर पोलिसांच्या मोठा बंदोबस्त आहे. जयदीप फरार होताच त्याची पत्नी आणि त्याची आई आपल्या मुलीसह शहापूरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हे शाखा त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस आणि कल्याण क्राईम ब्रँचकडून त्यांचीही चौकशी सुरु झाली. त्यानंतर गुरुवारी त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यात आले.
संभाजी ब्रिगेडने केले होते आंदोलन
जयदीप आपटे याचे घर बंद असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्याच्या घराबाहेर अंडी फेकून आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जयदीप आपटेचे कुटुंब पोलिसांच्या नजर कैदेत आहे.
सात पथकांकडून शोध
या प्रकरणात फरार शिल्पकार जयदीप आपटेचा शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आहे. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहे. परंतु अजूनही आपटे सापडला नाही.