म्हाडाची बनावट वेबसाईट, 30-30 लाख रुपयांमध्ये मुंबईत फ्लॅट, दोघांची सुरु केला फसवणुकीचा असा धंदा
Mumbai Crime News: पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना फ्लॅट घेण्याचे सांगत असल्याचे मान्य केले. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, गोरेगावमध्ये 30 लाख रुपयांमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष आरोपी दाखवत होते. त्यासाठी बनावट वेबसाईटची लिंक पाठवत होते.
मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपले हक्काचे घर असावे, असे स्वप्न अनेक मध्यमवर्गीय पाहत असतात. त्या लोकांसाठी सरकारकडून म्हाडामार्फत (महाराष्ट्र आवास आणि क्षेत्र विकास प्राधिकरण) घरांची विक्री होत असते. म्हाडाच्या घराच्या शोधात असणाऱ्या लोकांची फसवणूक करण्याचा नवीन धंदा दोघांनी सुरु केला. त्यासाठी म्हाडासारखीच बेवसाईट बनवली. घर घेणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना त्या वेबसाईटमार्फत पेमेंट करण्याचे सांगितले जात होते. त्यासाठी दोघांपैकी एक जण म्हाडाचा अधिकारी बनला. अखेर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. दोघांना अटक केली आहे.
पोलिसांकडून दोघांना अटक
मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने म्हाडाच्या बनावट वेबसाईटचा भांडाफोड केला आहे. कल्पेश सेवक नावाच्या व्यक्तीने ओरिजनल वेबसाईटची कॉपी करुन दुसरी बेबसाईट बनवली. त्या माध्यमातून लोकांची फसवणूक सुरु केली. कल्पेश याने त्यासाठी अमोल पटेल याला सोबत घेतले. अमोल पटेल स्वत:ला म्हाडाचा अधिकारी म्हणत होता. तो एका फ्लॅटसाठी 30 लाख रुपये देण्याचे सांगत होता. फ्लॅटसुद्धा मुंबईतील गोरेगावमध्ये असल्याचे तो सांगत होता. हा प्रकार सायबर क्राईम विभागाने उघड केला. त्यानंतर कल्पेश सेवक याला माहीममधून तर पटेल याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली.
ग्राहक शोधून बनावट लिंक
बनावट वेबसाईट mhada.org पटेल आणि सेवक यांनी केली. त्यानंतर ग्राहक शोधून त्यांना ऑनलाइन लिंक पाठवू लागले. त्यामाध्यमातून पेमेंट करण्याचे ते सांगत होते. ही बेबसाईट म्हाडाची ऑफिशियल वेबसाइट http://mhada.gov.in सारखीच दिसत होती. त्यामुळे युजरचा विश्वास बसत होता. म्हाडाकडून यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर आरोपींना पकडण्यात आले.
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना फ्लॅट घेण्याचे सांगत असल्याचे मान्य केले. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, गोरेगावमध्ये 30 लाख रुपयांमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष आरोपी दाखवत होते. त्यासाठी बनावट वेबसाईटची लिंक पाठवत होते. अटक केल्यानंतर आता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.