Mumbai Theft : मालकाच्या घरात 54 लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला अटक, कामावरुन काढल्याच्या रागातून केले कृत्य

कोणताही पुरावा नसताना तक्रार नोंदवल्यानंतर जुहूचे सहपोलीस निरीक्षक विजय धोत्रे आणि त्यांच्या पथकाने जुहू आणि आसपासच्या परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करून, तसेच सीडीआर व डम डाटाचा तांत्रिक तपास करून एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने व त्याच्या मित्राने मिळून नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.

Mumbai Theft : मालकाच्या घरात 54 लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला अटक, कामावरुन काढल्याच्या रागातून केले कृत्य
मालकाच्या घरात 54 लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 4:20 PM

मुंबई : जुहू येथे मालकाच्या घरात 54 लाखांची चोरी (Theft) करणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतिश सुरेश शिवगण आणि अंकुश मोंडे अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरी केलेले दागिने आणि पैसे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मालकाने कामावरुन काढल्याच्या रागातून नोकरा (Servant)ने मित्राच्या मदतीने मालकाच्या घरात चोरी केली. याप्रकरणी मालकाने जुहू पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार जुहू पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेत दोघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सतिश शिगवण हा शिगवण हा विलेपार्ले येथील तर अंकुश मोंडे हा नालासोपारा येथील रहिवासी आहे.

कामावरुन काढल्याच्या रागातून केली चोरी

फिर्यादी हे जेष्ठ नागरिक असून व्यावसायिक आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा फिर्यादी यांच्या बंगल्यात नोकर म्हणून काम करत होता. महिनापूर्वी काही कारणावरुन मालकाने नोकराला कामावरुन काढून टाकले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन नोकराने मित्राच्या मदतीने मालकाच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. आरोपीला मालकाला घरातील ए टू झेड माहिती होती. घरात पैसे कोठे ठेवतात, घरातील दागिने कोठे असतात, मालक घरात केव्हा येतात आणि बाहेर केव्हा जातात. त्यानुसार चोरीची योजना आखत 16 जून रोजी मालक बाजारात गेले असताना नोकराने डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाला. मालक जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे कळले. त्यानंतर त्यांनी तात्काळ जुहू पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली.

कोणताही पुरावा नसताना तक्रार नोंदवल्यानंतर जुहूचे सहपोलीस निरीक्षक विजय धोत्रे आणि त्यांच्या पथकाने जुहू आणि आसपासच्या परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करून, तसेच सीडीआर व डम डाटाचा तांत्रिक तपास करून एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने व त्याच्या मित्राने मिळून नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आली. (Servant arrested for stealing Rs 54 lakh from owners house in juhu mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.