बाबा शाहरुखशी बोलताना आर्यन ढसाढसा रडला, NCB म्हणाली दोन मिनिटांत आटप
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे. NCB ने शाहरुख खानला आर्यनसोबत केवळ दोनच मिनिटं फोनवर बोलण्याची परवानगी दिली होती. चौकशीदरम्यान आणि वडिलांशी फोनवर बोलतानाही आर्यन सातत्याने रडत असल्याची बाब समोर आली आहे.
आर्यन खान ढसाढसा रडला
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
भारताबाहेर यूके, दुबईतही ड्रग्सचे सेवन
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.
‘मन्नत’मध्येही सर्च ऑपरेशन
शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत आपल्या सहा मजली मन्नत बंगल्यामध्ये राहतो. मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात समुद्रासमोरच प्राईम लोकेशनला हा बंगला आहे. काही महत्त्वाच्या दिवशी शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात. ईद, दिवाळी किंवा होळीसारख्या सणांच्या दिवशीही शाहरुख बाल्कनीमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. हे पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या बंगल्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार दोनशे कोटी रुपयांच्या घरात आहे.
‘मन्नत’वर छापेमारीची शक्यता का?
शाहरुखचा मुलगा आर्यनचा सर्वात जवळचा मित्र अरबाज मर्चंट कुठून ड्रग्ज आणायचा याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. या प्रकरणात अजूनही छापे टाकले जात आहेत आणि मोठ्या अटकेची अपेक्षा आहे. एनसीबीचे छापे दिल्लीत सुरु असून एक टीम गोमित चोप्राच्या घरीही पोहोचली आहे. NCB च्या सूत्रांनुसार अटक प्रक्रियेनंतर, NDPS कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक आरोपीच्या घरात शोध मोहीम घेण्याचीही तरतूद आहे, अशा परिस्थितीत NCB मुंबईत सुपरस्टार शाहरुख खानचे घर मन्नतमध्ये सर्च मोहीम राबवेल असे मानले जात आहे.
संबंधित बातम्या :
संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?
कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?
शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?