Mumbai Gold : मुंबई विमानतळावरुन 5.38 कोटी रुपये किंमतीचं 12 किलो सोनं जप्त! कुणी लपवलं चक्क बेल्टमध्ये सोनं?

परदेशी नागरिकांनी एक विशिष्ट प्रकाराचा तयार केलेला बेल्ट परिधान केला होता. या बेल्टबाबत शंका आली म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं आढळलं. या सोन्याचं वजन केलं असता, तब्बल 12 किलो सोनं असल्याचं तपासाअंती निष्पन्न झालं.

Mumbai Gold : मुंबई विमानतळावरुन 5.38 कोटी रुपये किंमतीचं 12 किलो सोनं जप्त! कुणी लपवलं चक्क बेल्टमध्ये सोनं?
12 किलो सोनं जप्तImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 12:50 PM

मुंबई : मुंबई कस्टम विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Chatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai) तब्बल 12 किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलं जातंय. एकूण सहा जणांना विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. छुप्या पद्धतीने सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करण्याच्या प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत परदेशी नागरिकावर अटकेची कारवाई करण्यात आल् आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Custom officers) एका प्रवाशाची तपासणी केली. तेव्हा या प्रवाशाने चक्क एका विशिष्ट प्रकारच्या बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं निदर्शनास आलं. अखेर कस्टम विभागाकडून याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच सोनंही हस्तगत करण्यात आलंय.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिकांनी एक विशिष्ट प्रकाराचा तयार केलेला बेल्ट परिधान केला होता. या बेल्टबाबत शंका आली म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं आढळलं. या सोन्याचं वजन केलं असता, तब्बल 12 किलो सोनं असल्याचं तपासाअंती निष्पन्न झालं.

हे सुद्धा वाचा

जप्त करण्यात आलेल्या 12 किलो सोन्याची किंमत तब्बल 5 कोटी 38 लाख रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही प्रवाशांकडून सोनं लपवून नेणाऱ्यास मदत करण्याचे प्रयत्न सुरु होते. पण अखेर कस्टम विभागाच्या रडारमध्ये हे सगळेजण सापडलेत. एकूण सहा जणांना कस्टम विभागाने अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांची आता कसून चौकशी केली जाते आहे.

आरोपीनं आपल्याकडे सोनं आहे, याची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती, असं कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही सुडानी नागरीक असल्याचीही माहिती समोर आली आहे. सुडानी नागरिकासह अटक करण्यात आलेल्या सर्वांची आता कसून चौकशी केली जातेय. हे सोनं कुठून आणलं? ते कुठे नेलं जात होतं? या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? या सगळ्याचा आता तपसा केला जातोय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.