Mumbai Crime : माशांऐवजी वांग्याची भाजी बनवली! संतापलेल्या मुलाची आईला मारहाण, आईचा मृत्यू, 11 वर्षांनी मुलाच्या शिक्षेत बदल

Mumbai Murder Case : 19 मार्च 2011 साली होळीच्या दिवशी हे भयंकर कृत्य केलं होतं.

Mumbai Crime : माशांऐवजी वांग्याची भाजी बनवली! संतापलेल्या मुलाची आईला मारहाण, आईचा मृत्यू, 11 वर्षांनी मुलाच्या शिक्षेत बदल
मुंबई हायकोर्टाकडून आरोपीला दिलासा...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 7:50 AM

मुंबई : आईची हत्या (Son killed mother) करणाऱ्या मुलाच्या शिक्षेत हायकोर्टाने बदल केला आहे. तब्बल 11 वर्षानंतर हा बदल करण्यात आला. या मुलाने आपल्या आईला रागाच्या भरात लोखंडी रॉडने जबर मारहाण (Son beaten mother) केली होती. त्यात या मुलाच्या आईला गंभीर जखमा झाल्या होत्या. नंतर तिचा जीवही गेला. दरम्यान, आता कलम 302 ऐवजी या आरोपी मुलावर 304 कलमांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हत्येऐवजी (Mumbai Murder News) आता यामुलावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा मुलगा डोंबिवलीतील असून त्यानं 19 मार्च 2011 साली होळीच्या दिवशी हे भयंकर कृत्य केलं होतं. आईने मासे न बनवल्याचा राग त्याच्या डोक्यात गेल्यानं त्यानं आईला अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.

नेमकी घटना काय?

याप्रकरणातील आरोपीचं नाव नरेश पवार आहे. तो डोंबिवलीतील निळजेपाडा इथं वीट भट्टीवर काम करतो. मार्च 2011 ला होळीच्या दिवशी तो घरी होता. माशांऐवजी आईने वांग्याची भाजी बनवली, याचा नरेशला राग आला होता. त्याने रागाच्या भरात लोखंडी सळीने आईला जीवघेणी मारहाण केली होती. यात त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी नरेश पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण सत्र न्यायालयानं आरोपी मुलाला दोषी ठरवत त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली होती.

9 वर्षांपासून तुरुंगात!

दरम्यान, कल्याण सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. नऊ वर्ष हा मुलगा कोठडीत शिक्षा भोगत होता. मुंबई हायकोर्टाने या मुलाच्या शिक्षेत बदल केला आहे. या मुलाने आईचा जाणूनबुजून खून केलेल नाही, असा युक्तिवाद आरोपी मुलाच्या वकिलांनी हायकोर्टात केला. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्यामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

यानंतर सरकारच्या वतीने आरोपी मुलाच्या शिक्षेत बदल करण्याच्या मागणीला विरोध करण्यात आला. पण अखेर मुंबई हायकोर्टानं या मुलाला अंशतः दिलासा दिलाय. अखेर कल्याण सत्र न्यायालयाने आयपीसी 302 कलमांतर्गत ठोठावलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केलाय. त्याऐवजी आता 304(2) नुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.