बलात्काराचा आरोप, आध्यात्मिक बाबाला कांदिवली पोलिसांकडून गुजरातमध्ये जाऊन बेड्या

बलात्काराच्या आरोपावरुन कांदिवली पोलिसांनी गुजरातमधून एका बाबाला अटक केली आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या बाबाला मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.

बलात्काराचा आरोप, आध्यात्मिक बाबाला कांदिवली पोलिसांकडून गुजरातमध्ये जाऊन बेड्या
बलात्काराच्या आरोपाखाली आध्यात्मिक बाबाला कांदिवली पोलिसांकडून गुजरातमध्ये जाऊन बेड्या
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 9:00 AM

मुंबई : बलात्काराच्या आरोपावरुन कांदिवली पोलिसांनी गुजरातमधून एका बाबाला अटक केली आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या बाबाला मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बाबाने महिलेला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर तक्रारीची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी एका बाबाला आधीच अटक केली होती. आता दुसऱ्या बाबाला 30 सप्टेंबर रोजी गुजरातमधून पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या बाबाचे नाव गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई आहे, ज्याचे वय 26 वर्षे आहे.

महिलेने या बाबावर बलात्काराचा आरोप केला आहे. सध्या कांदिवली पोलिसांनी बाबांना अटक केली. काल (शुक्रवारी) न्यायालयात हजर केलं असता बाबाला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

मुंबईत चोरलेलं साडेचार लाखांचं सोनं कांदिवली पोलिसांना गुजरातमध्ये कसं सापडलं?

मुंबईतून चोरुन नेलेले आणि गुजरातमधील जमिनीच्या आत लपवून ठेवलेले सोने कांदिवली पोलिसांनी शोधून काढले. सोनसाखळी चोरीचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना यश आले असून 4 लाख 57 हजार 306 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत.

मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात राहणारे एक जोडपे 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अन्यत्र राहायला गेले होते. त्यांनी आपल्या घराची दुरुस्ती आणि संपूर्ण घरात फरशा बसवण्याचे काम दोघा जणांना दिले होते. यावेळी चुकून त्यांच्या तिजोरीची चावी घरातच राहिली.

गुजरातमध्ये जमिनीखाली सोने गाडले

आरोपींनी 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत तिजोरीत ठेवलेले लाखो रुपये किमतीचे सोने चोरले आणि गुजरातमधील एका गावात नेऊन जमिनीखाली गाडले. त्यानंतर ते मुंबईला परत आले आणि त्यांनी घरातील कामे करण्यास सुरुवात केली.

घरातील सोनं गायब

22 तारखेला घरातील दुरुस्ती काम आटोपल्यावर तक्रारदार शंकर शीना पुजारी जेव्हा त्यांचे घर पाहण्यासाठी आले, तेव्हा त्यांना घरातील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळले.

पीडित दाम्पत्याने याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपासादरम्यान पोलिसांनी घरात काम करणाऱ्या एका मजुराला पकडले आणि चौकशी केली असता त्याने सांगितले की हे सोने घरात काम करणाऱ्या दोन्ही मजुरांनी मिळून चोरले होते. त्यानंतर ते गुजरातमधील गावात जमिनीखाली पुरले.

मुंबई पोलिस गुजरातमध्ये

घटनेची माहिती मिळताच कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या शोध पथकाने आरोपींना गुजरातमध्ये नेण्यात आले आणि जमिनीतून सोने जप्त करण्यात आले.

हे ही वाचा :

मुंबईत चोरलं, गुजरातमध्ये जमिनीखाली पुरलं, साडेचार लाखांचं सोनं पोलिसांना कसं सापडलं?

सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास; नाशिकमध्ये आज सकाळी झालेल्या धाडसी चोरीने खळबळ

लहान-मोठ्या जाऊबाई, मुंबईत महिलांना हेरायच्या, संधी मिळताच पर्स, दागिने चोरी करायच्या, अखेर सोन्याच्या काठीसह बेड्या

दरोड्याचा तयारीतील तिघांना बेड्या, पुणे-कोकणातील नऊ घरफोड्या उघड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.