Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गुंतवणूकदार तरुणाचे अपहरण करणाऱ्या शेअर ब्रोकरला अटक; 11 लाखांच्या खंडणीचा डाव बोरिवली पोलिसांनी उधळला

बोरिवली पश्चिमेकडे राहत असलेल्या प्रियांक लखाणी या 27 वर्षीय तरुणाचे अपहरण केले होते. आरोपी अक्षत नेमीचंद सुराणा याने आपल्या 3 साथीदारांच्या सोबतीने प्रियांकचे कारमधून पळवून नेले होते. यासंदर्भात 27 तारखेला प्रियांकचे वडील विपुल लखाणी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

Video : गुंतवणूकदार तरुणाचे अपहरण करणाऱ्या शेअर ब्रोकरला अटक; 11 लाखांच्या खंडणीचा डाव बोरिवली पोलिसांनी उधळला
गुंतवणूकदार तरुणाचे अपहरण करणाऱ्या शेअर ब्रोकरला अटक
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:54 AM

मुंबई : गुंतवणूकदार तरुणाचे अपहरण(Kidnapping) करून 11 लाखांची खंडणी उकळण्याचा डाव बोरिवली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी या प्रकरणातील अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली आणि धमकी देणाऱ्या शेअर ब्रोकर(Share Broker)ला अटक केली. अक्षत नेमीचंद सुराणा असे आरोपी शेअर ब्रोकरचे नाव आहे. तर प्रियांक लखानी असे अपहरण करण्यात आलेल्या गुंतवणूकदार तरुणाचे नाव आहे. पोलिसांत तक्रार दाखल करताच बोरिवली पोलिसांनी काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. तरुणाच्या अपहरणाचा सर्व प्रकार परिसरात असलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. (Stock broker arrested for kidnapping investor youth in borivali)

सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने गुन्ह्याचा छडा

गुंतवणूकदार तरुणाच्या अपहरणाचा संपूर्ण कट सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. आरोपी शेअर ब्रोकर अक्षत नेमीचंद सुराणा हा आपल्या 4 साथीदारांसोबत भगवती हॉटेलजवळ उभा असल्याचे दिसत आहे. घटनास्थळावर आरोपीने 25 वर्षीय गुंतवणूकदार प्रियांक लखानीला बोलावले होते. सुरुवातीला काही वेळ त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर आरोपीने प्रियांकला मारहाण केली आणि नंतर त्याला एका लाल रंगाच्या कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बोरिवली पोलिसांनी एका तासाच्या आत अपहरणाच्या गुन्ह्याचा छडा लावला.

तरुणाला कारमधून पळवून नेले

बोरिवली पश्चिमेकडे राहत असलेल्या प्रियांक लखाणी या 27 वर्षीय तरुणाचे अपहरण केले होते. आरोपी अक्षत नेमीचंद सुराणा याने आपल्या 3 साथीदारांच्या सोबतीने प्रियांकचे कारमधून पळवून नेले होते. यासंदर्भात 27 तारखेला प्रियांकचे वडील विपुल लखाणी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. माझा मुलगा प्रियांक याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत. काही लोकांनी त्याला बोरिवलीतील भगवती हॉटेलजवळ बोलावून त्याचे अपहरण केले आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन बोरिवली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तात्काळ तपास पथक बनवून दहिसर पश्चिम परिसरांमधून आयसी कॉलनीतून मोबाईलचे लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी अक्षत नेमीचंद सुराणा याला अटक केली.

प्रियांक याने काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केले होते. मात्र त्याला संभाव्य तोट्याची कल्पना आल्यानंतर त्याने पुढे पैसे न गुंतवण्याचे ठरवले. प्रियांककडून आणखी पैसे गुंतवण्यास नकार आल्यानंतर आरोपी अक्षत नेमीचंद सुराणा याने 11 लाखांच्या खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली. याचदरम्यान प्रियांकच्या अपहरणाचा कट रचण्यात आला होता. सुदैवाने बोरिवली पोलिसांनी तत्परता दाखवल्याने प्रियांकच्या जीवाचे बरेवाईट होण्याआधीच आरोपीला अटक करण्यात यश आले. (Stock broker arrested for kidnapping investor youth in borivali)

इतर बातम्या

Mumbai Accident : फायर ब्रिगेडच्या मॉक ड्रिलदरम्यान विचित्र अपघात; माटुंग्यातील घटनेत 3 जवान गंभीर जखमी

Supreme Court : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना चाप बसणार; सुप्रीम कोर्ट तातडीने सुनावणी घेण्याच्या तयारीत

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.