मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे मांजरीचे पिल्लू दत्तक घेणार, कोर्टात अर्ज
mumbai police sachin vaze : मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिव वाझे विविध आरोपांखाली कारागृहात आहे. सचिन वाझे याने मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारी दोन पानांची हस्तलिखित याचिका सचिन वाझे याने सादर केली आहे. हे मांजरीचे पिल्लू आजारी असल्याचे त्याने म्हटले आहे.
मुंबई, दि. 24 नोव्हेंबर | मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे कारागृहात आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे आरोपी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. सचिन वाझे तुरुंगात ज्या कोठडीत आहे, त्या कोठडीतील मांजराचे पिल्लू आजारी पडले आहे. हे पिल्लू दत्तक घेण्यासाठी सचिन वाझे याने न्यायालयात अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टात त्याने अर्ज केला आहे. सचिन वाझे याच्या मागणीनंतर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
सचिन वाझेवर अनेक आरोप
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब स्फोटक ठेवल्याचा आरोप सचिन वाझे याच्यावर आहे. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकरणात सचिन वाझे एनआयए कोठडीत आहे. सचिन वाझे असलेल्या तळोजा कारागृहात एक मांजरीचे पिल्लू आजारी आहे. ते पिल्लू दत्तक घेण्याची मागणी करणारी याचिका सचिन वाझे याने कोर्टात दिली आहे.
मांजरीच्या पिल्ल्याचे नामकरण
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला येरवडा कारागृहातील त्यांच्या बैरकमधील आजारी मांजरीचे पिल्लू दत्तक घ्यायचे आहे. सचिन वाझे याने या मांजरीच्या पिल्लाचे नामकरण केले आहे. त्याला त्याने झुमका नाव दिले आहे. या पिल्ल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण त्याला दत्तक घेऊ इच्छित असल्याचे त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे. हे मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारी दोन पानांची हस्तलिखित याचिका सचिन वाझे याने सादर केली आहे. न्यायालयाने याबाबत तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. गुरुवारी सचिन वाझे याला अँटिलिया बॉम्ब स्फोटक खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने ही मागणी केली.